Pune Property tax | Vishal Dhanwade | पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतकर वसुलीसाठी  अभय योजना राबवा | माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

HomeपुणेBreaking News

Pune Property tax | Vishal Dhanwade | पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतकर वसुलीसाठी  अभय योजना राबवा | माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

गणेश मुळे May 14, 2024 3:31 PM

Pune Municipal Corporation (PMC) launched investigation campaign to give 40% Property tax discount!
Pune Property tax Bill | पुणेकरांना मिळकतकराची 12 लाख बिले वाटपाची प्रक्रिया सुरु! | मिळकतकर विभागाचे नियोजन तयार
Pune Property tax Discount | प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5-10% सवलत मिळवण्यासाठी उरले अवघे 10 दिवस! | आतापर्यंत महापालिकेला 632 कोटींचे उत्पन्न 

Pune Property tax | Vishal Dhanwade | पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतकर वसुलीसाठी  अभय योजना राबवा | माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Municipal Corporation Property tax- (The Karbhari News Service) पुणे शहरातील मिळकत करातील थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना लागू करावी. अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे (Vishal Dhanwade) यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
धनवडे यांच्या पत्रानुसार पुणे महानगर पालिका कर आकारणी व कर संकलन विभागाकडील एकूण मिळकतीची संख्या जवळपास १४ लक्ष असून, मे २०२४ अखेर जवळपास ८ लक्ष मिळकतीकडून एकूण थकबाकी जवळपास ९,००० कोटी इतकी वसूल होणे अद्याप शिलक आहे. एकूण थकबाकी रक्कमेत निव्वळ कराची मागणी ३,७०० कोटी इतकी असून महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम १९४९ मधील प्रकरण ८ नियम ४९ नुसार मुदतीत कर न भरल्यामुळे आकारण्यात आलेली दरमहा २ % व्याजाची रक्क्म जवळपास ५३०० कोटी इतकी झाली आहे .
धनवडे यांनी पुढे म्हटले आहे कि, दरमहा आकारण्यात आलेला २% शास्तीची रक्कम निवळ मागणी पेक्षा अधीक झाली असल्याने मिळकत करामध्ये मिळकत कर भरणे बाबत उदासीनता दिसून येत आहे . पुणे महानगरपालिका हद्दीतील थकीत मिळकतकराचा विचार करता यापूर्वी देखील स्थायी समिती व मुख सभेची मान्यता घेऊन शास्ती रकमेवर माफी देऊन यापुर्वी सन २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये अभय येजना राबवण्यात आलेल्या आहेत.
धनवडे यांनी म्हटले आहे  २०२४-२५ करीता अभय योजना घोषित करावी जेणेकरून थकबाकीचा फुगवटा कमी होऊन महानगरपालिकेच्या तिजोरीत मोठया प्रमाणात थकीत मिळकत कर वसूल होणास मदत होईल.