Pune Property Tax | पुणेकरांना PT 3 अर्ज भरण्यासाठी महापालिका ऑनलाईन सुविधा उपलब्ध करणार | उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन
PMC PT 3 Application- (The Karbhari News Service) – पुणेकर नागरिक सध्या PT 3 अर्ज भरण्यावरून सध्या त्रस्त आहेत. अर्ज न भरल्याने बऱ्याच लोकांना मिळकत करात 40% मिळाली नाही. हे टाळण्यासाठी आणि नागरिकांना सवलत देण्यासाठी पुणे महापालिका मिळकतकर विभाग PT 3 अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. असे आश्वासन उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिले आहे. (Pune Municipal Corporation Property tax)
रविवारी सजग नागरिक मंच च्या वतीने आयोजित केलेल्या ” पुणे महापालिका मिळकतकर आकारणीसंबंधी सर्व काही” या चर्चासत्रात बोलताना कर आकारणी प्रमुख माधव जगताप यांनी हे आश्वासन दिले. (Sajag Nagrik Manch)
यावेळी माधव जगताप म्हणाले, कोणाला ४०% सवलत मिळते व कोणाला मिळत नाही हे बिलावरून कळत नसल्याने पुढील वर्षीपासून प्रत्येक बिलामध्ये यासंबंधीची नोट छापली जाईल. तसेच PT 3 form नक्की कुणी भरायचा हेच कळत नसल्यामुळे महापालिका ज्या ज्या प्राॅपर्टीजना ४०% सवलत मिळत नाही त्या प्राॅपर्टीचे क्रमांक महापालिका स्वतः च्या वेबसाईट वर लवकरच प्रसिद्ध करेल जेणेकरून त्या त्या नागरीकांना PT 3 form भरून देणे शक्य होईल.
जगताप पुढे म्हणाले, नागरीकांच्या property tax संबंधीच्या तक्रारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर निवारण होतील , जेणेकरून नागरीकांना महापालिका मुख्यालयात येण्याची गरज नाही. जर क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असतील वा सहकार्य करत नसतील तर थेट माधव जगताप यांचे मोबाईलवर WhatsApp करावा. PT 3 form online भरता यावा यासाठी लवकरच महापालिका सोय करणार आहे. जगताप यांनी पुढे सांगितले कि, मिळकतकरासंबंधी नागरीकांच्या काॅमन शंकांचे निरसन व्हावे यासाठी FAQ महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
या कार्यक्रमाला माधव जगताप यांचेबरोबरच सहायक आयुक्त अस्मिता तांबे उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले तर जुगल राठी यांनी आभार मानले.