Pune Property tax Discount | प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5-10% सवलत मिळवण्यासाठी उरले अवघे 3 दिवस! | आतापर्यंत महापालिकेला 836 कोटींचे उत्पन्न 

HomeBreaking Newsपुणे

Pune Property tax Discount | प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5-10% सवलत मिळवण्यासाठी उरले अवघे 3 दिवस! | आतापर्यंत महापालिकेला 836 कोटींचे उत्पन्न 

गणेश मुळे May 28, 2024 4:11 PM

Pune Property Tax Auction | व्यावसायिक मिळकतीच्या लिलावातून महापालिकेला 18 लाख 74 हजारांचे उत्पन्न! 
Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1330 कोटींचे उत्पन्न | 68% लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा केला उपयोग
PMC will provide online facility to Pune residents to fill PT 3 application

Pune Property tax Discount | प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5-10% सवलत मिळवण्यासाठी उरले अवघे 3 दिवस! | आतापर्यंत महापालिकेला 836 कोटींचे उत्पन्न

PMC Property tax Discount – (The Karbhari News Service) – आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत  मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये ५% व १०% इतकी सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांकडे अवघे 3 दिवस उरले आहेत. त्यामुळे मिळकतधारकांनी मिळकत कर लवकरात लवकर भरावा. असे आवाहन उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation Property tax Department)

दरम्यान पुणे महानगरपालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १४.२२ लक्ष इतकी असून, सर्व मिळकतधारकांना भारतीय पोस्ट विभागामार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची देयके पाठवण्यात आली आहेत. तरी, ज्या मिळकतधारकांना अद्याप देयके प्राप्त झाली नसतील, त्यांनी मिळकतकर विभागाच्या
propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर आपले देयक पाहू अथवा डाऊनलोड करू शकतात.

1 एप्रिल ते 28 मे अखेर 4,93,705 इतक्या मिळकतधारकांनी रक्कम 836 कोटी इतका मिळकत कर पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेला आहे. यामध्ये 62174 इतक्या मिळकतधारकांनी रक्कम 226 कोटी इतकी रक्कम धनादेशाद्वारे जमा केलेली आहे.  85756 इतक्या मिळकतधारकांनी रक्कम 88 कोटी इतकी रोख रक्कम स्वरूपात जमा केलेली आहे. तसेच सर्वाधिक 3,45,775 (70.04%) इतक्या नागरिकांकडून online / digital प्रणालीद्वारे रक्कम रु 521.54 कोटी जमा करण्यात आले आहेत.
पुणे महानगरपालिकेचे सर्व CFC (नागरी सुविधा केंद्र ) शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक शासकीयसुट्टीच्या दिवशी देखील सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहणार असून, मिळकतधारकांनी नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही, त्याऐवजी जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाईन पध्द्तीने कर भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन मिळकतकर भरण्यासाठी खालील पर्याय / सुविधा उपलब्ध आहेत:-
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay, UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, Amazon Pay, NEFT-RTGS, etc.