Pune Property tax Discount | प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5-10% सवलत मिळवण्यासाठी उरले अवघे 10 दिवस! | आतापर्यंत महापालिकेला 632 कोटींचे उत्पन्न 

HomeपुणेBreaking News

Pune Property tax Discount | प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5-10% सवलत मिळवण्यासाठी उरले अवघे 10 दिवस! | आतापर्यंत महापालिकेला 632 कोटींचे उत्पन्न 

गणेश मुळे May 21, 2024 3:16 PM

Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1068 कोटींचे उत्पन्न 
Pune Property Tax | मिळकत कर वसुलीसाठी दामिनी महिलांची 12 पथके | कर वसुलीसाठी पहिल्यांदाच महिलांना जबाबदारी 
Pune Property Tax | डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ४० कोटींचा मिळकत कर जमा | चालू आर्थिक वर्षात विभागाने वसूल केला १८४१ कोटींचा महसूल

Pune Property tax Discount | प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5-10% सवलत मिळवण्यासाठी उरले अवघे 10 दिवस! | आतापर्यंत महापालिकेला 632 कोटींचे उत्पन्न

PMC Property tax Discount – (The Karbhari News Service) – आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत  मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये ५% व १०% इतकी सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांकडे अवघे 10 दिवस उरले आहेत. Tyamule मिळकतधारकांनी मिळकत कर लवकरात लवकर भरावा. असे आवाहन उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation Property tax Department)

दरम्यान पुणे महानगरपालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १४.२२ लक्ष इतकी असून, सर्व मिळकतधारकांना भारतीय पोस्ट विभागामार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची देयके पाठवण्यात आली आहेत. तरी, ज्या मिळकतधारकांना अद्याप देयके प्राप्त झाली नसतील, त्यांनी मिळकतकर विभागाच्या
propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर आपले देयक पाहू अथवा डाऊनलोड करू शकतात.

1 एप्रिल ते 21 मे अखेर ३,९७,५१८ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम ६३२.९१ कोटी इतका मिळकत कर पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेला आहे. यामध्ये ४५,४१७ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम १४८.९८ कोटी इतकी रक्कम धनादेशाद्वारे जमा केलेली आहे. तर ६८, ४२२ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु ६८.४० कोटी इतकी रोख रक्कम स्वरूपात जमा केलेली आहे. तसेच सर्वाधिक २,४०,८४० इतक्या नागरिकांकडून online / digital प्रणालीद्वारे रक्कम रु ४१७.११ कोटी जमा करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेचे सर्व CFC (नागरी सुविधा केंद्र ) शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक शासकीयसुट्टीच्या दिवशी देखील सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत सुरु राहणार असून, मिळकतधारकांनी नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही, त्याऐवजी जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाईन पध्द्तीने कर भरावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ऑनलाईन मिळकतकर भरण्यासाठी खालील पर्याय / सुविधा उपलब्ध आहेत:-
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay, UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, Amazon Pay, NEFT-RTGS, etc.