Pune property tax | ४०% सवलत मिळते की नाही याबद्दल मिळकतकर बिलात ठळकपणे उल्लेख करण्याची मागणी

Homeadministrative

Pune property tax | ४०% सवलत मिळते की नाही याबद्दल मिळकतकर बिलात ठळकपणे उल्लेख करण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Mar 26, 2025 10:27 PM

PMC Property Tax Department | वसुलीसाठी प्रॉपर्टी टैक्स विभागाकडे अतिरिक्त ५५ कर्मचारी!
Madhav Jagtap PMC | महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागचा अतिरिक्त पदभार उपयुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
Pune Property Tax | मिळकत कर वसुलीसाठी दामिनी महिलांची 12 पथके | कर वसुलीसाठी पहिल्यांदाच महिलांना जबाबदारी 

Pune property tax | ४०% सवलत मिळते की नाही याबद्दल मिळकतकर बिलात ठळकपणे उल्लेख करण्याची मागणी

Pune Property Tax Bill – (The Karbhari News Service) – मिळकत करातील ४०% सवलत मिळते की नाही याबद्दल मिळकतकर बिलात ठळकपणे उल्लेख करावा. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation property tax Bill)

वेलणकर यांच्या निवेदन नुसार मिळकतकरातील ४०% सवलतीवरुन मध्यंतरी खूप मोठा गदारोळ झाला होता. आपल्याला ही सवलत मिळते की नाही हेच मुळी मालमत्ता कर बिल वाचून कळत नाही, त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. खरं तर ही करदात्या नागरीकांची मूलभूत गरज आहे, पण दुर्दैवाने नागरीकांनाच काय पण महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा नुसते बिल पाहून सदरहू बिलात ४०% सवलत दिली गेली आहे की नाही हे समजत नाही , त्यासाठी त्यांनाही मनपा संगणक प्रणालीमध्ये शोधावे लागते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मिळकतकर बिले बनविण्याचे काम सध्या महापालिकेत सुरू आहे , तेंव्हा किमान यंदापासून तरी या मिळकतकर बिलावर त्या बिलात ४०% सवलत दिली गेली आहे की नाही हे ठळकपणे छापावे जेणेकरून करदात्या नागरीकांमधील या संबंधीचा संभ्रम संपुष्टात येईल. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.