Pune News | पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा : अन्यथा मोदी, खुर्ची खाली करा’ | पुणे शहर महिला काँग्रेसचे आंदोलन

HomeBreaking News

Pune News | पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा : अन्यथा मोदी, खुर्ची खाली करा’ | पुणे शहर महिला काँग्रेसचे आंदोलन

Ganesh Kumar Mule May 15, 2026 9:03 PM

Congress | Inflation | महंगाई पे हल्ला बोल काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार
Signature campaign | राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम
Supriya Sule | महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे | खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

Pune News | पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा : अन्यथा मोदी, खुर्ची खाली करा’ | पुणे शहर महिला काँग्रेसचे आंदोलन

 

Inflation – (The Karbhari News Service) –  पेट्रोल, डिझेल, घरगुती-व्यावसायिक गॅस सिलेंडर चे दर वाढविणाऱ्या आणि सामान्यांचे जगणे हैराण करणाऱ्या नाकर्त्या मोदी सरकारने सत्तेच्या खुर्च्या खाली करायला हव्यात, अन्यथा जनतेची आंदोलने अधिक तीव्र केली जातील, असा इशारा पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी सरकारला दिला आहे. (Pune Women Congress)

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी) कॅंप भागातील कांचन सर्व्हिस पेट्रोल पंपा समोर महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी आणि स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

पाच राज्यातील निवडणुकांत हजारो लिटर इंधन भाजपने मोटारीतून प्रचारासाठी वापरले, मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला. इंधनवाढ होऊ देणार नाही, असं खोटं आश्वासन दिलं. जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनाची, पैशांची उधळपट्टी केली आणि निवडणुका आटपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत. ही कृतीच संतापजनक आहे, असे स्वाती शिंदे यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मुख्य मंत्री परदेशात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन गुंतवणुकीचे करार करतात. या करारांमधून काहीही साध्य झाले नाही, उलट गेल्या तीन महिन्यांत दीड लाख कोटींची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली आहे. ही माहिती लपवून मोदीजी पाच देशांच्या दौऱ्यावर निघून गेले आहेत, अशी टीका महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी यांनी केली. देशापुढील आर्थिक संकट कसे निस्तरणार हे संसदेत सांगा, असे प्रिया वंदनाजी म्हणाल्या.

‘ट्रंप बोले, मोदी डोले’, ‘परदेश दौऱ्यात मोदी व्यस्त, जनता त्रस्त’, ‘लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. या आंदोलनात अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, प्राजक्ता जाधव, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, रेखा जैन, नसीम शेख, जया गोयल, मीना शेंडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: