Floating Spider Machine | तलाव आणि नदी स्वच्छतेसाठी अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे जांभूळवाडी येथे प्रात्यक्षिक

Homeadministrative

Floating Spider Machine | तलाव आणि नदी स्वच्छतेसाठी अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे जांभूळवाडी येथे प्रात्यक्षिक

Ganesh Kumar Mule Jun 26, 2026 5:41 PM

OPS PMC Employees  | १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या ४२५ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू! महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश
BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे
Navale Bridge Accident | अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा – मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश | यंत्रणांवर जबाबदारी निश्चित

Floating Spider Machine | तलाव आणि नदी स्वच्छतेसाठी अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे जांभूळवाडी येथे प्रात्यक्षिक

 

Mayor Manjusha Nagpure – (The Karbhari News Service) – जलस्रोतांचे संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पुणे महानगरपालिकेच्या वतीने जांभूळवाडी तलाव येथे अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. (Pune Breaking News)

तलाव, नद्या व इतर जलस्रोतांमध्ये वाढणारी जलपर्णी प्रभावीपणे काढण्यासाठी हे आधुनिक यंत्र उपयुक्त ठरणार असून, जलप्रदूषण नियंत्रणासोबतच जलस्रोतांची स्वच्छता आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच यंत्राच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलस्रोत स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या प्रात्यक्षिक कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, नगरसेवक संदीप बेलदरे तसेच राजेश ठाकूर देसाई, संतोष लांडगे आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी भविष्यात अशा यंत्रणांचा व्यापक वापर करून पुणे शहरातील तलाव आणि नद्यांचे संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

स्वच्छ जलस्रोत, निरोगी पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: