Pune PMC News | छपाई कामासाठी लागणारे रील पेपर, कार्डशीट पेपर खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा तुषार पाटील यांचा आरोप  | मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच टेंडर लावल्याचा उपायुक्त यांचा खुलासा 

Homeadministrative

Pune PMC News | छपाई कामासाठी लागणारे रील पेपर, कार्डशीट पेपर खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा तुषार पाटील यांचा आरोप  | मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच टेंडर लावल्याचा उपायुक्त यांचा खुलासा 

Ganesh Kumar Mule Sep 10, 2025 7:52 PM

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल | किशोरी शिंदे यांच्याकडील क्रीडा तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग संतोष वारुळे यांच्याकडे
PMC Sport Scholarship | पुणे शहरातील खेळाडूंसाठी चांगली बातमी | दोन वर्षांची क्रीडा शिष्यवृत्ती एकत्रच दिली जाणार | महापालिका क्रीडा विभागाने मागवले अर्ज
PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे घनकचरा विभाग, संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन विभाग तर किशोरी शिंदे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी

Pune PMC News | छपाई कामासाठी लागणारे रील पेपर, कार्डशीट पेपर खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा तुषार पाटील यांचा आरोप  | मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच टेंडर लावल्याचा उपायुक्त यांचा खुलासा

 

PMC Tender – (The Karbhari News Service) – मुद्राणमहर्षी मामराव दाते मुद्रालय मध्ये सन २०२५-२६ साठी छपाई कामासाठी लागणारे रील पेपर, कार्डशीट पेपर खरेदी करणे या कामी मुद्राणमहर्षी मामराव दाते मुद्रालय या विभागामार्फत निविदा प्रकिया राबविण्यात आली आहे. त्याची अंतिम मुदत  १७ सप्टेंबर  दुपारी २.३० वाजता पर्यंत आहे. मात्र  “खरेदीदार विभागांनी निविदेमध्ये नामांकित ब्रॅण्डच्या वस्तूची मागणी करावयाची असल्यास एकच ब्रॅण्ड नमूद न करता किमान ०३ ब्रॅण्ड नमूद करणे आवश्यक राहील’ अशी तरतूद राज्य सरकार कडून केली असताना  हा नियम डावलला असल्याचा आरोप भाजप नेते तुषार पाटील यांनी केला आहे. यावर उपायुक्त किशोरी शिंदे यांनी खुलासा केला आहे कि, आम्ही कुठलाही नियम डावलला नाही. मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच यंदा देखील टेंडर प्रक्रिया राबवली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

तुषार पाटील यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे  मागणी केली आहे कि, संबंधित टेंडर प्रकिया रद्द केली जावी. पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, मध्यवर्ती भांडार कार्यालयकडे सर्व निविदांमध्ये मोठा भष्ट्राचार आहे.   टोनर खरेदी मागील २०१८ पासून ते २०२३ खरेदी तुलना बघता २५ लाख पेक्षा कधी जास्त खरेदी न होणारी वस्तू मागच्या वर्षी तब्बल अंदाजे २ कोटी च्या सुमारास गेली आहे. नवीन टोनर दिल्यास व तो खराब झाल्यास तो टोनर रिफिलिंग न करता नवीन टोनर खात्याकडे देण्यात येते सदर टोनर हे “CANON / HP / BROTHER“ या सारख्या उत्पादक कंपनीचे नसून “ Compatible टोनर” घेत आहे ज्याचा दर देखील जास्त आहे व १५ दिवसाचा आत यांना रिफीलिंग करणे गरज पडते” या पूर्वी माहिती व तंत्रज्ञान विभाग मार्फतच सदर कामाकरिता बजेट तरतूद व सर्व गोष्टी तपासून व्यवस्थारीत्य काम सुरळीत होते तथापि आता कुठलीही तपसणीन करता खातेप्रमुख यांच्या स्तरावर परस्पर बिल देण्यात येते या मध्ये मनपाचे भरपूर नुकसान झाले आहे.

पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, स्वछता साहित्य खरेदी मध्ये निविदा अटी व शर्ती पूर्णपणे डावलून ज्यामधील  ०७/०७/२०२५ च्यापत्रामध्ये अ.क्र १ ते ४ अटीस मा.आयुक्त/ अतिरिक्त आयुक्त यांची पूर्व मान्यता न घेता आपल्या मनाला येईल तसे कामकाज करून अत्यंत चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची छाननी करून अपात्र ठेकेदाराला पात्र केले असून सदर बाब सिद्ध झाले असून खातेप्रमुख म्हणून त्यांनी सर्व चुकीच्या गोष्टी आर्थिक बाबींसाठी केल्या असून त्यांचावर दोषी ठरल्यामुळे मनपा अधिनियम ५६ ३ नुसार तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

पाटील यांनी  आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे कि, भांडार विभागाची सर्व निविदा संशयास्पद करणारी असून याची  चौकशी करून एक सक्षम दर्जाचे शासनाचा अधिकारी नेमला जावा.


 

उपायुक्त किशोरी शिंदे यांनी क्रीडा विभागात भरीव काम करणे अपेक्षित आहे. तिथे सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. भांडार विभागात काही बदल करून महापालिकेचे नुकसान करणे योग्य नाही. महापालिका आयुक्तांनी याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे.

तुषार पाटील, उपाध्यक्ष, भाजप 


प्रिटींग प्रेस संबंधित टेंडर प्रक्रिया ही मागील वर्षीच्या टेंडर प्रमाणेच केली आहे. यात कुठेही नियमाला बगल दिलेली नाही. बदल करायचा झाल्यास आम्हाला नवीन मंजुरी घ्यावी लागते. तसेच टोनर खरेदीचे टेंडर अजून लावण्यात आलेले नाही. ही प्रक्रिया डिसेंबर २०२६ मध्ये केली जाईल. कारण आता पर्याप्त टोनर उपलब्ध आहेत.

किशोरी शिंदे, उपायुक्त. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: