Pune PMC News | म्हात्रे पुलाजवळ स्वच्छतागृह दोन दिवसात सुरु करणार | तक्रारी नंतर घनकचरा विभागाने उचलले पाऊल 

Homeadministrative

Pune PMC News | म्हात्रे पुलाजवळ स्वच्छतागृह दोन दिवसात सुरु करणार | तक्रारी नंतर घनकचरा विभागाने उचलले पाऊल 

Ganesh Kumar Mule Mar 04, 2026 7:17 PM

E Waste – Green Byte | शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन
Pune Property Tax | मिळकतकर कमी करून देतो म्हणून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार  | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन
Pune Property Tax Abhay Yojana | पुणे शहर आणि समाविष्ट गावातील मिळकतधारकांसाठी महत्वाची बातमी | मिळकत कर विभागाची विशेष अभय योजना!

Pune PMC News | म्हात्रे पुलाजवळ स्वच्छतागृह दोन दिवसात सुरु करणार | तक्रारी नंतर घनकचरा विभागाने उचलले पाऊल

 

PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – म्हात्रे पुलाजवळ  लाखो रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या घनकचरा विभाग ( मुख्य खाते) यांनी उभारलेले स्वच्छतागृह आजही कुलुपबंद अवस्थेत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांनी तक्रार केली होती. याची गंभीर दखल महापालिका घनकचरा विभागाने घेतली आहे. हे स्वच्छतागृह दोन दिवसात  क्षेत्रीय कार्यालयाच्या ताब्यात देऊन सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी दिली.  (Pune News)

वेलणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते कि, पुण्यात लोकस़ंख्येच्या मानाने उपलब्ध असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत कमी असताना बांधून तयार असलेली स्वच्छतागृहे दोन दोन वर्षे कुलुपबंद अवस्थेत असावीत हे नागरीकांचे दुर्दैव आहे. म्हात्रे पुलाजवळ २६.५ लाख रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या घनकचरा विभाग ( मुख्य खाते) यांनी उभारलेले स्वच्छतागृह आजही कुलुपबंद अवस्थेत आहे. या ३६० स्क्वेअर फूटच्या टाॅयलेटच्या बांधकामाला ७३०० रूपये प्रति स्क्वेअर फूट या भावाने पैसे देण्यात आले. ( महापालिकेच्या तज्ञ अभियंत्यांनी याचं अंदाजपत्रक १०,००० रुपये प्रति स्क्वेअर फूट या भावाने केले होते , ठेकेदाराने यापेक्षा २५% कमी दराने टेंडर भरल्याने त्याला काम देण्यात आले.)  हे काम २०२४ मार्च मधे पूर्ण झाले पण तरीही कुलुपबंदच राहिले. सहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्या घनकचरा विभागाने  आणखी दहा लाख रुपये खर्च करुन वर केअर टेकर साठी बांधकाम केले गेले , मात्र आजही हे टाॅयलेट कुलुपबंद अवस्थेतच आहे. या स्वच्छता गृहातून बाहेर पडणारे मैलापाणी नक्की कोठे सोडले जात आहे याचा उलगडा होत नाही.  आवश्यक त्या दुरुस्त्या करून हे स्वच्छतागृह तातडीने खुले करण्याचे आदेश द्यावेत. ही आग्रहाची मागणी आहे. असे विवेक वेलणकर यांनी म्हटले होते.

याची गंभीर दखल महापालिका घनकचरा विभागाने घेतली आहे. तसेच आवश्यक दुरुस्त्या सुरु केल्या आहेत. त्याचप्रमाणे आगामी दोन दिवसात स्वच्छता गृह सुरु करण्याबाबत हालचाली देखील सुरु केल्या आहेत.


आगामी दोन दिवसात आम्ही या स्वच्छतागृहाचा ताबा क्षेत्रीय कार्यालयाला देत आहोत. त्यानंतर ते सुरु करण्यात येईल. तसेच बाहेर पडणारे मैलापाणी हे ड्रेनेज लाईनला जोडले आहे.

| अविनाश सकपाळ, उपायुक्त, घनकचरा विभाग. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0