Pune PMC News | क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ संकल्पना राबविण्यात येणार | विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

Homeadministrative

Pune PMC News | क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ संकल्पना राबविण्यात येणार | विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

Ganesh Kumar Mule Feb 16, 2026 9:04 PM

Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 
PMC Election | पुणे मनपा निवडणुक |  प्रारूप मतदारयादी 23 जूनला होणार,  | मतदार 1 जुलैपर्यंत हरकती मांडू शकतात
Pune News | वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी प्रकल्प राबवावेत – विभागीय आयुक्त | ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न

Pune PMC News | क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ संकल्पना राबविण्यात येणार | विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

PMC Pune – (The Karbhari News Service) – आज पुणे महानगरपालिका पथ विभागामार्फत प्रभाग १२, लकाकी रोड, मॉडेल कॉलनी येथे विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार  सिद्धार्थ शिरोळे,  महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते  गणेश बिडकर,  महापालिका आयुक्त  नवल किशोर राम व प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation – PMC)

अभियानाच्या अंतर्गत फुटपाथवर असलेले विद्युत खांब, फलक, डीपी बॉक्स इत्यादी अडथळे फुटपाथच्या कडेस घेण्यात येणार आहे. फुटपाथ पादचाऱ्यांकरिता समतल करण्यात येणार आहे.

तसेच  अभियाना अंतर्गत शिवाजीनगर परिसरातील लकाकी रोड, थोरात चौक ते वेताळबाबा चौक हे दोन रस्ते प्राधान्याने हाती घेतलेले आहेत. या दोन्ही रस्त्याची अंदाजित लांबी १४०० मीटर इतकी असुन, या दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अस्तित्वातील पदपथाची योग्य प्रकारे दुरूस्ती करून सदरचे पदपथ आदर्शरित्या विकसित करण्यात येतील व त्यानंतर त्या धर्तीवर संपुर्ण पुणे शहरात सदरचे फुटपाथ दुरूस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे नागरिकांकरिता उत्तम दर्जाचे व समपातळीत असणारे फुटपाथ कोणत्याही अडथळ्या शिवाय वापरणे शक्य होणार आहे.

फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन करताना महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘जागल्या’ या संकल्पनेची माहिती दिली. ‘जागल्या’ या संकल्पनेच्या अंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘जागल्या’ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. सदर कर्मचाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात रोज एक ते दोन तास पायी चालून परिसरातील फुटपाथवर असलेल्या अडथळ्यांच्या नोंदी, आवश्यक दुरूस्ती इत्यादी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला माहिती सादर करावयाची आहे. त्यानुसार पदपथावरील अडथळे दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियान आणि ‘जागल्या’ संकल्पनेमुळे पादचाऱ्यांना चालणे सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: