Pramod Nana Bhangire | संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दया- प्रमोद नाना भानगिरे

HomeBreaking News

Pramod Nana Bhangire | संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दया- प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Mar 04, 2025 4:15 PM

Cantonment Board Elections | पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या | मोहन जोशी
Art Of Living | आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | मराठा सेवा संघाकडून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन 

Pramod Nana Bhangire | संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दया- प्रमोद नाना भानगिरे

| संतोष देशमुख हत्येप्रकरणी शिवसेनेची तीव्र निदर्शने: हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडचा पुतळा जाळला..!

 

Santosh Deshmukh Case – (The Karbhari News Service) – मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अमानुष हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून अ मानवीय पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी पुणे शहर शिवसेनेच्या (Pune Shivsena) वतीने डेक्कन येथील अलका चौकात तीव्र निदर्शने करत मारेकऱ्यांच्या फाशीची मागणी करण्यात आली. पुणे शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी वाल्मीक कराडचा पुतळा जाळून तातडीने त्यास फाशी देण्याची प्रमुख मागणी केली. (Pramod Nana Bhangire Pune Shivsena)

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यांपूर्वी अपहरण करून अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली होती. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून या या हत्येच्या निषेधार्थ अलका चौक येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराड याचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये दाखल झाले असून शिवसैनिकांनी वाल्मीक कराडचा पुतळा जाळून तीव्र निदर्शने करत आंदोलन केले.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हस्ते चा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच असून न्यायालयाने विशेष खटला दाखल करीत सर्व आरोपींना ताबडतोब फासावर लटकवायला हवे संपूर्ण महाराष्ट्रात या हत्येच्या निषेधार्थ
जनभावनेचा मोठा आक्रोश निर्माण होत असून मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फासावर लटकवा तरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल असे शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी म्हटले आहे.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझिरे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत, महिला आघाडी शहर प्रमुख श्रुती नाझीरकर, सुरेखा पाटील,उपशहर प्रमुख संतोष राजपूत, प्रमोद प्रभुणे सुधीर कुरुमकर, सचिन थोरात, शहर संघटक आकाश रेणुसे,समीर नाईक, गौरव साइनकर, जितेंद्र जंगम,राजाभाऊ भिलारे, अक्षय आवटे, आकाश माझिरे, शिव कामगार सेना शहर प्रमुख संदीप शिंदे, नितीन लगस नवनाथ निवंगुणे, राजू परदेशी निलेश जगताप, दीपक कुलाळ, प्रणव थोरात शंकर संगम,शितल गाडे, स्मिता कांबळे, सुरेखाताई पाटील, अक्षय तारू व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: