Pune PMC News | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली रद्द करा | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

HomeपुणेBreaking News

Pune PMC News | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली रद्द करा | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

गणेश मुळे Mar 20, 2024 9:36 AM

PMC Pune Tender | RTO टेंडर बाबतची तक्रार निराधार | महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचा खुलासा
PMC Pune Scholarship | १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याची मागणी 
Nanded City Township Property Tax | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT ३ अर्ज भरून देण्याची आवश्यकता नसल्याचा माजी नगरसेवकांचा दावा 

Pune PMC News | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली रद्द करा | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त
विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) यांच्या बदलीचा जोरदार विरोध होताना दिसतो आहे. त्यांचा पुणे महानगरपालिकेतील कालावधी पूर्ण झालेला नाही. तसेच त्यांच्या बदलीने महापालिकेच्या कामावर परिणाम होईल. त्यामुळे त्यांची बदली करू नये. अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
माजी नगरसेवकांच्या निवेदनांनुसार  मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेच्या आणि मार्गदर्शक तत्त्वाच्या आधाराने काही बदल्या करणे प्राप्त होते. त्या प्रमाणे त्या झाल्या असतील. परंतु  ढाकणे हे त्या बदलीच्या निकषात बसतील असे आम्हाला वाटत नाही.  पुण्यामध्ये कार्यरत असताना थोड्या कालावधीमध्ये अतिशय चांगलं शहराच्या विकासात भर टाकणार काम श्री विकास ढाकणे यांनी केलं आहे. (PMC Pune)
पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त नवीन, एक अतिरिक्त आयुक्त नवीन आणि फक्त एकच जुने अतिरिक्त आयुक्त बिनवडे कार्यरत आहे. तसेच महापालिकेतील चार उपायुक्तांच्या देखील बदल्या झालेल्या आहेत. या सगळ्या घडामोडीचा शहराच्या विकास कामांवर परिणाम होऊ शकतो.  आमची मागणी  आहे की श्री विकास ढाकणे यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये ठेवावे.  त्यांची
बदली रद्द करणे  करणे हा सरकारचा अधिकार आहे हे आम्हाला मान्य आहे. तरीदेखील आमची आपणास विनंती आहे की पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी श्री विकास ढाकणे यांना कार्यरत ठेवावे. असे निवेदनात म्हटले आहे.