Pune News | 120 TPH ची कागदपत्रे देऊन 90 TPH हॉट मिक्स प्लांट उभारल्याचा आरोप | माजी विरोधी पक्षनेत्यांकडून आयुक्तांकडे स्वतंत्र चौकशीची मागणी

Homeadministrative

Pune News | 120 TPH ची कागदपत्रे देऊन 90 TPH हॉट मिक्स प्लांट उभारल्याचा आरोप | माजी विरोधी पक्षनेत्यांकडून आयुक्तांकडे स्वतंत्र चौकशीची मागणी

Ganesh Kumar Mule Aug 07, 2026 7:53 PM

PMC Deputy Commissioner | अखेर उपयुक्तांना वाटून दिले विभाग | चेतना केरूरे यांच्याकडे परिमंडळ ५, आशा राऊत यांना परिमंडळ ३ तर माधव जगताप यांच्याकडे फक्त मिळकतकर विभागाची जबाबदारी 
Mhatoba Tekadi Pune  | टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा!| चंद्रकांतदादा पाटील यांचे वन विभागाला निर्देश
Gormale Yatra | नात्यांमधील वीण घट्ट करणारी.. नाती एकसंघ करणारी आणि दुरावा मिटवणारी गोरमाळ्याची यात्रा! 

Pune News | 120 TPH ची कागदपत्रे देऊन 90 TPH हॉट मिक्स प्लांट उभारल्याचा आरोप | माजी विरोधी पक्षनेत्यांकडून आयुक्तांकडे स्वतंत्र चौकशीची मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने शहरातील रस्त्यांचे रिईनस्टेटमेंट करण्यासाठी काढलेल्या 25-25 कोटींच्या तीन निविदांबाबत गंभीर आरोप झाला आहे. ठेकेदार देवकर अर्थमूव्हर्स यांनी निविदेत 120 TPH क्षमतेच्या हॉट मिक्स प्लांटची कागदपत्रे सादर केली असली तरी प्रत्यक्षात जागेवर 90 TPH क्षमतेचा प्लांट उभारल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. (PMC Road Department)

या तिघांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर हा आरोप खरा असेल तर निविदेच्या अटींचा भंग झाला आहे. निविदेत 120 TPH प्लांट बंधनकारक असताना 90 TPH प्लांट कसा स्वीकारला गेला, प्रत्यक्ष पाहणी कोणी केली, क्षमता तपासूनही ठेकेदाराला पात्र कसे ठरविले, कागदपत्रांची पडताळणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली आणि नियमभंग झाल्यानंतरही कारवाई का झाली नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

निविदा तपासणारे आणि मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिकाही निष्पक्षपणे तपासली जावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. चौकशीत कोणत्याही अधिकाऱ्याचे संगनमत किंवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.

देवकर अर्थमूव्हर्स यांनी सादर केलेली कागदपत्रे, प्रत्यक्ष उभारलेला प्लांट, कॅलिब्रेशन प्रमाणपत्र आणि संपूर्ण निविदा प्रक्रिया यांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जर 120 TPH ऐवजी 90 TPH प्लांट असल्याचे सिद्ध झाले तर संबंधित ठेकेदाराला अपात्र घोषित करून नियमांनुसार कारवाई करावी. तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

पुणेकरांच्या कराच्या पैशावर कोणालाही डल्ला मारू दिला जाणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: