Pune Municipal Corporation Security Guard | पुणे महापालिका राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेणार 100 सुरक्षारक्षक

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation Security Guard | पुणे महापालिका राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेणार 100 सुरक्षारक्षक

Ganesh Kumar Mule May 22, 2023 2:22 AM

PMC Projects | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा आढावा
Nagar Road BRT | नगररोड येथील बीआरटी मार्ग काढल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात! | डॉ सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप
Kalagram | वर्षभरात साकारणार कलाग्राम | पु. ल. देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण

Pune Municipal Corporation Security Guard | पुणे महापालिका राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेणार 100 सुरक्षारक्षक

| अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई तीव्र करण्यासाठी निर्णय

Pune Municipal Corporation Security Guard | (Author : Ganesh Mule) | पुणे शहरात (Pune city) अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे (Encroachment and Illégal construction)!वाढताना दिसत आहेत. महापालिकेकडून (PMC Pune) यावर कारवाई केली जाते. मात्र ती तोकडी पडताना दिसते आहे. शिवाय कारवाई करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कारवाई साठी आवश्यक मनुष्यबळ देखील महापालिकेकडे अपुरे आहे. त्यामुळे पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpari-chinchwad Municipal Corporation) धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (Maharashtra State Security Corporation) 100 सुरक्षा रक्षक घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या (PMC commissioner) मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation Security Guard)

पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून ती निष्कासित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रस्ता पदपथावर (Footpath) अतिक्रमणे वाढत असून वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने ती काढणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) ही “अ” वर्ग दर्जा प्राप्त झालेली महानगरपालिका असून स्मार्ट सिटी शहरामध्ये समावेश झालेला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) यापूर्वी ११ व नवीन २३ गावांचा समावेश झाला असलेने पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ वाढले आहे. (Pune Municipal Corporation News)

पुणे शहरातील मुख्य रस्ते-पदपथ व त्यालगतच्या मिळकती/इमारतीच्या साईड मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणांची (Side Margin illegal construction) संख्या सतत वाढत असल्याने नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळे होत असल्याने नागरिकांच्या वारंवार
तक्रारी महानगरपालिकेच्या विविध खात्यांकडे विविध माध्यमांद्वारे येत आहेत. महापालिका आयुक्त यांनी अशा अनधिकृत व शहरातील बकालपणा वाढविणाऱ्या अतिक्रमणांवर संबंधित विभागांची संयुक्त कारवाईची विशेष मोहीम राबवून कारवाया करण्याचे आदेश यापूर्वी  दिलेले आहेत. (PMC Pune news)
पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे (PMC Pune Ward offices) हद्दीमधील जास्त रहदारी व वाहनांची वर्दळ असणारे रस्ते व चौक, तसेच संवेदनशील भागातील तक्रारी येणारी ठिकाणे इ. भागात आढळून येणारी सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामे / फेरीवाले / स्टॉल / हातगाडी, अनधिकृत बोर्ड / बॅनर, तसेच रस्त्यांलगतच्या खाजगी मिळकतीचे फ्रंट मार्जिन / साईड मार्जिन मधील अनधिकृत व्यवसायिकांची अतिक्रमणे/कच्ची, पक्की बांधकामे यांचेवर संबंधित विभागांचेसह सलगपणे सयुंक्तपणे कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येऊन दैनंदिन सयुंक्त कारवाई मोहीम चालू आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायिक यांचा विरोध होऊन अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकारी / कर्मचारी यांचेवर हल्ले होत आहेत. (PMC Pune Marathi News)
शासन निर्णयान्वये पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग येथे विवरणपत्र ‘अ’- नागरी पोलीस यंत्रणा – १३० व विवरणपत्र ‘ब’- पोलीस आयुक्त कार्यालयाशी संलग्न आर्थिक गुन्हे शाखेत नागरी गुन्ह्यांची नोंदणी तपास व खटल्यासाठी विशेष कक्ष- २८ अशी एकूण १५८ पदेमंजूर आहेत. प्रत्यक्षात सध्या २ पो.नि., १ पो.उ.नि. व ३५ पोलीस कर्मचारी हजर असून त्यापैकी दिर्घकालीन रजा (प्रसुती, बाल संगोपन) गैरहजर, सिक यांचेमुळे तसेच २ पोलीस निरीक्षकांपैकी १ पोलीस निरीक्षक यांचेकडे सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा प्रभारी चार्ज असल्याने मुख्य खात्यातून कारवायांचे नियंत्रण करतात. त्यामुळे प्रत्यक्षात कारवाईसाठी २ अधिकारी व २० ते २२ पोलीस कर्मचारीकर्तव्याकरिता उपलब्ध होतात. त्यामुळे कारवाईमध्ये बंदोबस्त कमी पडल्यामुळे कर्मचार्यांवर हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत. (Pune Municipal Corporation security Guard News)
 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून (Maharashtra State Security Corporation) सेवा घेण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते व चौक, तसेच संवेदनशील भागातील तक्रारी येणारी ठिकाणे इ. भागात आढळून येणारी सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामे / फेरीवाले / स्टॉल / हातगाडी, अनधिकृत बोर्ड / बॅनर, तसेच रस्त्यांलगतच्या खाजगी मिळकतीचे फ्रंट मार्जिन / साईड मार्जिन मधील अनधिकृत व्यवसायिकांची अतिक्रमणे/कच्ची, पक्की बांधकामे यांचेवर संबंधित विभागांचेसह सलगपणे सयुंक्तपणे कारवाई मोठ्या प्रमाणात चालू असून निविघ्न पार पाडत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत देखील 100 सुरक्षा घेण्याचा प्रस्ताव अतिक्रमण विभागाकडून तयार करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation Marathi News) 
—–
News Title | Pune Municipal Corporation Security Guard |  Pune Municipal Corporation will hire 100 security guards from the State Security Corporation