Pune Municipal Corporation Schools | विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी पुणे महापालिकेच्या 10 शाळांचे होणार विलीनीकरण! | मराठी, ऊर्दू इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश! 

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation Schools | विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी पुणे महापालिकेच्या 10 शाळांचे होणार विलीनीकरण! | मराठी, ऊर्दू इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश! 

गणेश मुळे Jul 19, 2024 3:22 PM

Ajit Deshmukh | थकबाकी असलेल्या 121 मिळकती टॅक्स विभागाने केल्या सील  | उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती 
PMC Health Officer | आरोग्य प्रमुखांचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे!
Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

Pune Municipal Corporation Schools | विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी पुणे महापालिकेच्या 10 शाळांचे होणार विलीनीकरण! | मराठी, ऊर्दू इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश!

Pune PMC Schools – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत शाळेत (PMC Schools) शिकणाऱ्या विद्यार्थी पटसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे शाळा विलीनीकरणाचा (PMC Schools Merged) प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. त्यानुसार 10 शाळांचे विलीनीकरण केले जाणार आहे. यामध्ये मराठी, ऊर्दू इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. मराठी माध्यमाच्या 5 शाळा व इंग्रजी माध्यम 2 आणि उर्दू माध्यम 3 शाळा अशा एकूण 10 शाळा विलीनीकरण  प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation Schools)
महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील सहायक प्रशासकीय अधिकारी व पर्यवेक्षक यांनी मनपाच्या प्राथमिक शाळांमधील सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी विदयार्थी पटसंख्येची तपासणी करून त्याअनुषंगाने कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण अन्य प्राथमिक शाळांमध्ये करण्याचे प्रस्ताव सादर केलेले आहेत.
मनपाच्या प्राथमिक विभागाकडील काही शाळा एकाच इमारतीत परंतू विभिन्न वेळी म्हणजे सकाळ सत्रात व दुपार सत्रात भरत असून सदर शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे व्यवस्थापनामध्ये अडचणी येत आहेत. असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
1. पटसंख्या कमी झाल्याने शासनाने मान्य केलेल्या संच मान्यतेमध्ये इ. 1 ते 8 वीच्या आठ तुकडयांना स्वतंत्रपणे आठ शिक्षक मान्य होत नाहीत. त्या ठिकाणी शिक्षकांना जोडवर्ग घ्यावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्याचे
शैक्षणिक नुकसान होत आहे.
2. सद्यस्थितीत पटसंख्या कमी झालेल्या काही शाळांमधून जे शिक्षक कार्यरत आहेत ते कमी पटसंख्येमुळे अतिरिक्त ठरत आहेत. शाळांचे विलिनिकरण केल्यास खालील प्रमाणे शाळा व्यवस्थापन व शालेय कामकाजामध्ये योग्य विलीनीकरण केल्यास नियोजन व सुसुत्रता होणेस मदत होणार असा प्रशासनाचा दावा.
1. सद्यस्थितीत एकाच इमारतीत सकाळ व दुपार सत्रातील शाळांची पटसंख्या 150 पेक्षा कमी असल्याने त्या दोन्ही शाळांना शासन मान्य शिक्षक निश्चितीनुसार मुख्याध्यापक मान्य होत नाही. दोन्ही शाळा एकत्र केल्यास शाळेचा पट वाढून त्या शाळेस मुख्याध्यापक पद मान्य होईल व त्याप्रमाणे मुख्याध्यापक नेमता येतील.

2. हे अतिरिक्त शिक्षक सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या इतर शाळातील रिक्त पदी बदलीने नियुक्त करता येतील. यामुळे दोन्ही शाळांची गरज पूर्ण होवून शालेय वर्ग नियोजन व प्रत्येक वर्गात शिक्षकांची नेमणूक करता येईल. पर्यायाने जास्तीत जास्त शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देता येतील.
3 .एकाच इमारतीत असणा-या दोन शाळांचे विलिनीकरण प्रस्तावित असल्याने कोणतीही शाळाबंद होणार नसून विद्यार्थ्यांना त्याच इमारतीत शाळा उपलब्ध होणार आहे. तसेच 2 कि.मी अंतराच्या आतील
शाळांमध्ये विलिनीकरण झाल्यास विद्यार्थांची गैरसोय होणार नाही.
4. पुणे शहरातील पुणे मनपाच्या इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम, विद्यानिकेतन शाळा, पुणे मनपा माध्यमिक शाळा,खाजगी प्राथमिक शाळामधून मुले मुली अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सहशिक्षण देत आहेत तसेच शाळाएकाच वेळी असल्यास बहिण-भाऊ एकाच वेळी शाळेत येवू शकतात. आर.टी.ई अॅक्टनुसार भावंडाच्या सोयीसाठी मुलाच्या शाळेत मुलींना व मुलींच्या शाळेत मुलांना प्रवेश देण्यास मुभा देण्यात आली आहे.त्यामुळे बालवाडी ते इ. 8वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना एकाच शाळेत सहशिक्षण देणे सोयीचे ठरणार आहे.
5. दोन सत्रातील शाळेची वेळ सध्या प्रत्येकी 5 घडयाळी तास इतकी आहे. त्यापैकी मधल्या सुटटीचा वेळ जाता केवळ 4 तास प्रत्यक्ष अध्यापन होते. आर.टी.ई. नुसार दर आठवडयाला 30 घडयाळी तास प्रत्यक्ष अध्यापन होणे बंधनकारक आहे. एका इमारतीत दोन सत्र शाळा न ठेवता एकच शाळा केल्यास विद्यार्थ्याचे अध्ययनाचे तास वाढविता येतील त्यामुळे शिक्षकांना जादा वेळ देवून अध्यापन करता येईल व पर्यायाने शैक्षणिक नियोजन उत्तम होवून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. शालेय इमारतीचा पूर्ण वेळ वापर करता येईल. विद्यार्थी सकाळी 7.00 वाजता शाळेत उपस्थित राहण्याचे प्रमाण कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे.
6. शाळा विलिनीकरणास मान्यता मिळाल्यास एकूण ८ बालवाडी शिक्षिका, ८ बालवाडीसेविका व ८ शिपाई व १ रखवालदार यांचे रिक्त पदी इतर शाळांवर बदलीने समायोजन करता येईल.