Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Nilesh Nikam Opposition Leader PMC

Homeadministrative

Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Ganesh Kumar Mule Sep 29, 2026 10:23 PM

NCP Vs Governor | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात आंदोलन 
Bhaiyyasaheb Jadhav : प्रभाग विकासाचे रोल मॉडेल स्थायी समिती अध्यक्षांच्याच प्रभागात का? लकी ड्रॉ काढून प्रभाग निवडा!  : राष्ट्रवादी नगरसेवक आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव यांची मागणी 
Khadakwasala Vidhansabha | NCP Ajit Pawar खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्याची मागणी | अजित पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

| अॅट्रॉसिटीच्या धमकीचा निषेध

 

Nilesh Nikam NCP – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम यांनी जाहीर अभिनंदन केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात निकम यांनी म्हटले आहे की, आपण अतिशय जबाबदारीने निर्णय घेत आहात. पथ विभागातील निविदांमध्ये अनियमितता आढळल्याने आपण संबंधित सल्लागार संस्थांची सेवा संपुष्टात आणली.

आपण अतिशय धाडसी निर्णय घेऊन *रस्त्याच्या निविदेचा विषय* मार्गी लावला. या एका निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेच्या तब्बल ९.०० कोटी रुपयांची बचत* झाली आहे.

मात्र, या निविदेबाबत आलेल्या बातम्यांनुसार, काही लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना *अॅट्रॉसिटी (Atrocity) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी* दिल्याचे समजते. या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे निकम यांनी पत्रात म्हटले आहे.

आपण करत असलेल्या नियमानुसार व पारदर्शक कामकाजाबाबत आम्ही व्यक्तिशः आपले अभिनंदन करतो. कोणताही दबाव न घेता असेच कार्य पुढे सुरू ठेवावे व पुणे शहराच्या हिताच्या विषयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: