Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | 28 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली! | पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय 

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | 28 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली! | पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय 

गणेश मुळे Jan 25, 2024 1:53 PM

Pune Bhide Wada Smarak News | भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होण्याचा मार्ग मोकळा ! | स्मारक खटल्याचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने
Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | Court relief to candidates who do not want to appear in the examination
Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | PMC Circular | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | 28 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्या बाबतचे सर्कुलर  

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | 28 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली!

| पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC)) आस्थापनेवरील कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून (Class 3 and 4) अभियांत्रिकी संवर्गात (Engineering Cadre) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil)) या पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. महापालिका प्रशासनाने 28 जानेवारीला परीक्षा (Exam) घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. उच्च नायालयाने महापालिकेला आदेश केले होते कि याबाबतच्या अडचणी टाळण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात (Deferr)  यावी. तरीही प्रशासन परीक्षा घेण्यावर ठाम होते. मात्र महापालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पुढील तारीख कोर्टाच्या निर्णया नंतर ठरवली जाणार आहे. असा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला.(Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (civil) promotion)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
त्यानुसार महापालिका प्रशासनाने परीक्षा घेण्याची तयारी केली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यासाठी 5 वर्षाचा अनुभव आणि स्थापत्य ची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्यानुसार 28 जानेवारीला ही परीक्षा घेतली जाणार होती.
दरम्यान काही उमेदवारांनी पाहिल्यापासूनच अशी परीक्षा घेण्याला विरोध होता. त त्यानुसार या उमेदवारांनी महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने या उमेदवारांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे कि याचिका दाखल करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा देऊन ते त्यात नापास झाले तरी प्रशासनाला या उमेदवारांना पदोन्नती साठी अपात्र करण्याचा अधिकार नाही. हा उमेदवारांना दिलासा मानला जात आहे. तसेच याबाबतच्या अडचणी टाळण्यासाठी महापालिकेने परीक्षा पुढे ढकलावी, असे कोर्टाने म्हटले आहे. मात्र महापालिका प्रशासन मात्र परीक्षा घेण्यावर ठाम होते. आम्ही ऐनवेळेला परीक्षा रद्द करणार नाही. असे प्रशासनाने म्हटले होते.
 मात्र महापालिका प्रशासनाने पुन्हा आपला निर्णय बदलला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची नवीन तारीख ही कोर्टाचा अंतिम निर्णय काय असेल, यावरून निश्चित केली जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे उमेदवारांना मात्र चांगलाच दिलासा मिळाला आहे.