Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचे ३६ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त 

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचे ३६ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त 

गणेश मुळे Jan 31, 2024 1:43 PM

Shrinath Bhimale BJP | श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कौतुक !
Kothrud Constituency | बाणेरमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील | चंद्रकांतदादा पाटील 
Pune Intak Congress | पुणे शहर जिल्हा इंटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी चेतन आगरवाल

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचे ३६ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त

 

PMC Retired Employees | जानेवारी 2024 महिन्यात पुणे महापालिकेच (Pune Municipal Corporation (PMC) 36 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (Pune PMC News)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक, व्याखाते व देशभक्तकोशकार  चंद्रकांत शहासने (Chandrakant Shahasane) उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, वेळेचे नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तदनंतर रविंद्र मुळे, उप अभियंता, राजेंद्र ढुमने, क्रीडा अधिकारी,  शरद हरके, अधीक्षक या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

The karbhari - PMC Employees list

सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चंद्रकांत शहासने यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना आरोग्य हीच संपत्ती आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांना वेळ द्या, रोज व्यायाम करावा, योग- योगासने करावीत, घरातील व शेजारील व्यक्तींशी वादावादी करू नका. आपण केलेली सेवा ही फार मोठी गोष्ट आहे असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले.