PMC Retired Employees | पुणे महापालिकेतील ४३ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त | सेवापूर्ती समारंभात सन्मान

दीपक राऊत (महापालिका सहाय्यक आयुक्त) यांचा सन्मान करताना मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, विठ्ठलराव वरुडे पाटील आदि.

Homeadministrative

PMC Retired Employees | पुणे महापालिकेतील ४३ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त | सेवापूर्ती समारंभात सन्मान

Ganesh Kumar Mule Oct 01, 2026 10:21 PM

Health Check up : PMC Employee : महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी 
TP Scheme | उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम | हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार 
PMC Ranking | PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग 4 थ्या वरून 3 ऱ्या स्थानावर

PMC Retired Employees | पुणे महापालिकेतील ४३ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त | सेवापूर्ती समारंभात सन्मान

| ‘सेवानिवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घ्या, रोज एक तास व्यायाम करा’ – विठ्ठलराव वरुडे पाटील

 

PMC Labour Welfare Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील सप्टेंबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या ४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महानगरपालिका कामगार कल्याण विभागाच्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करून गौरव करण्यात आला. या वेळी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. (Nitin Kenjale PMC)

या कार्यक्रमास माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी सेवापूर्ती समारंभाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या विविध रकमा, त्यांची गुंतवणूक आणि भविष्यातील आर्थिक नियोजन याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

सेवानिवृत्त सेवकांना भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केंजळे यांनी केले. तसेच सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे दीपक राऊत (महापालिका सहाय्यक आयुक्त), ललित बेंद्रे (अधीक्षक अभियंता), डॉ. अस्मिता बोधे (वैद्यकीय अधिकारी), धनंजय परदेशी (उप प्रशासकीय अधिकारी) आणि काशिनाथ शिंदे (अधीक्षक) यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवांच्या आठवणी सांगत महापालिकेचे आभार मानले. तसेच त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी विजय शिंदे (प्रशासन अधिकारी), राजेश कादबाने (प्रशासन अधिकारी) आणि गणेश मांजरे यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रमुख पाहुणे विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दिलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकाने आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा, तसेच दररोज एक तास व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. सर्वांना पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अलका जोशी यांनी केले, तर आयोजनाची जबाबदारी अमित चव्हाण यांनी पार पाडली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: