Pune Metro | पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ९० हजार पार | पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये निरंतर वृद्धी
Pune Metro – (The Karbhari News Service) – ६ मार्च २०२४ रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते रामवाडी मेट्रो स्टेशन या मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर मेट्रो प्रवाशांच्या संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. जून २०२४ या महिन्यांमध्ये दररोजची प्रवासी संख्या ९० हजारांच्या पुढे गेली असून, जून महिन्यात सरासरी प्रतिदिन सरासरी ९३,१९८ प्रवासी संख्येची नोंद झाली आहे आणि प्रतिदिन सरासरी उत्पन्न १४,७३,६४८ रुपये इतके झाले आहे. अशी माहिती पुणे मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro News)
पुणेकरांचा मेट्रोला मिळणारा प्रतिसाद उत्साह जनक आहे आणि यामुळे वाहनांची गर्दी व प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होत आहे. आजमितीस पुणे मेट्रोच्या ३३.२ किमी मार्गीकेपैकी २९.५८ किमी चा मार्ग कार्यान्वयीत झाला असून उर्वरित ३.६२ किमी च्या मार्गावर वेगाने काम चालू असून येत्या दोन ते तीन महिन्यात हा मार्ग देखील प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
सरासरी दररोज ५००० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणाऱ्या स्थानकांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक, पुणे रेल्वे मेट्रो स्थानक, रामवाडी मेट्रो स्थानक, वनाज मेट्रो स्थानक, पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानक, नळ स्टॉप मेट्रो स्थानक ही स्थानके आढळून आली आहेत.
प्रवासी संख्येची पर्पल मार्गीका (मार्गीका १) पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक व ऍक्वा मार्गीका (मार्गीका २) वनाझ मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक अशी प्रवासी संख्येची विभागणी बघितल्यास जून महिन्यात दैनंदिन मार्गीका १ वर २२,०९७ प्रवाश्यांची प्रवास केला तर मार्गीका २ वर ४७,५६७ प्रवाश्यांची प्रवास केला.
——–
याप्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “जून महिन्यात दैनंदिन सरासरी मेट्रो प्रवासी संख्या ९० हजारांच्या पुढे पोहोचली असून पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये हा खूप मोठा सकारात्मक बदल दिसून येत आहे यामुळे सार्वजनिक व्यवस्था वाहतूक व्यवस्था बळकट होताना दिसत आहे.”