Pune Metro Service | धुलीवंदनाच्या दिवशी पुणे मेट्रोने प्रवास करणार असाल तर मेट्रोची बदललेली वेळ जाणून घ्या
Pune Metro Service – (The Karbhari News Service) – येत्या सोमवारी म्हणजे २५ मार्च रोजी धुळवड निमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा दुपारी २:०० ते रात्री १०:०० या वेळेत उपलब्ध असणार आहे. अशी माहिती पुणे मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
येत्या सोमवारी धुलीवंदन अर्थात धुळवड आहे. या निमित्ताने पुण्यात रंग खेळले जातात. याचा मेट्रोच्या स्वच्छतेवर परिणाम होऊ नये म्हणून, मेट्रोने त्या दिवशी वेळ बदलली आहे. सर्वसामान्यपणे मेट्रो वेळ ही सकाळी ६ ते रात्री १० अशी असते. मात्र सोमवारी दुपारी २ ते १० अशी असणार आहे. म्हणजे सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत मेट्रो सेवा बंद असणार आहे.