Pune Metro | चंद्रकांतदादा पाटील यांचेकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी | दिले महत्वाचे संकेत
Chandrakant Patil – (The Karbhari News Service) – बुधवार २५ डिसेंबर रोजी चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) कामाचा आढावा घेतला. महामेट्रोचे (Mahametro) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (भाप्रसे) (Shravan Hardikar IAS) यांनी पुणे मेट्रोच्या ३३ किमी मार्गाच्या टप्पा क्रमांक १ च्या उर्वरित कामासंबंधी माहिती दिली तसेच सध्याची मेट्रो प्रवासी संख्या व ती वाढवण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते मंडई मेट्रो स्थानक असा मेट्रोतून प्रवास केला. मंडई स्थानक येथे स्थानिक आमदार हेमंत रासने (MLA Hemant Rasane) यांनी त्यांचे स्वागत केले. (Pune News)
पुणे मेट्रो टप्पा १ च्या मार्गावर विस्तारित कामासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामधील पीसीएमसी – निगडी या मार्गावर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराची नेमणूक होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. स्वारगेट – कात्रज या मार्गाची निविदा अंतिम टप्प्यात असून लवकरच ठेकेदाराची नेमणूक करण्यात येईल.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ७ मार्गिका असून त्यामधील वनाझ ते चांदणी चौक (१.२ किमी, २ स्थानके), रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (११.६३ किमी, ११ स्थानके), खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी (२५.६६ किमी, २२ स्थानके), एसएनडीटी-वारजे-माणिकबाग (६.१२ किमी, ६ स्थानके) हे मार्ग केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. हडपसर ते लोणी काळभोर (११.३५ किमी, १० स्थानके) आणि हडपसर ते सासवड (५.५७ किमी, ४ स्थानके) हे मार्ग पुणे महानगरपालिकेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. निगडी-मुक्ताई चौक-वाकड-नाशिक फाटा-चाकण या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरु आहे.
या प्रसंगी मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (महाराष्ट्र शासन) यांनी पुणे मेट्रो जे मार्ग सुरु आहेत त्याचे व्यवस्थित संचालन सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व म्हंटले की, “६ मार्च २०२२ रोजी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरु आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य होत आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकार तर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल.”
COMMENTS