Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये 260 पदांची शिक्षक भरती
| इंग्रजी माध्यम करार पद्धतीवरील शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध
Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्राथमिक शिक्षण विभागाच्या (Primary Education Department) इंग्रजी शाळांमध्ये (English School) 260 पदांसाठी शिक्षक भरती (PMC Teacher Recruitment) करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर उमेदवार घेण्यात येणार आहेत. महापालिकेकडून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023)
शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे महानगरपालिका (PMC Pune Primary Education Department) संचलित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन २०२३-२४ करिता तात्पुरत्या स्वरुपात केवळ सहा महिनेपेक्षा कमी कालावधीकरिता दरमहा एकवट मानधन २००००/- (वीस हजार रुपये फक्त) वर करार पद्धतीवरील इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदाकरिता निवड, प्रतीक्षा यादी, शैक्षणिक
व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे. (PMC Pune Recruitment)
● शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व प्राधान्यक्रमाने खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल.
१) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
३) इ. १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड/बी. एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
५) वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी/ सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एकूण पदे – २६० (Pune Municipal Corporation)
उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसापर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत अर्ज शिक्षण विभाग (प्राथमिक), कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५ येथे समक्ष हस्ते पोहोच सादर करावेत. पोस्टाने / टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेवून यावीत. सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना व जाहिरात https://www.pmc.gov.in/en/