SSC Results | कासारआंबोलीचा जुनैद तांबोळी  SSC परीक्षेत मुळशी तालुक्यात प्रथम

HomeपुणेBreaking News

SSC Results | कासारआंबोलीचा जुनैद तांबोळी SSC परीक्षेत मुळशी तालुक्यात प्रथम

Ganesh Kumar Mule Jun 07, 2023 5:20 PM

Water Closure | pune | गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार 
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने संकलित केल्या शेकडो गाद्या, उशा, चिंध्या | वस्तू संकलन महाअभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
MPSC Exam | MPSC च्या विद्यार्थ्यांचे पुण्यासह राज्यभरात आंदोलन

SSC Results | कासारआंबोलीचा जुनैद तांबोळी SSC परीक्षेत मुळशी तालुक्यात प्रथम

SSC Results |  मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये (SSC Exam) कासार आंबोलीचा सुपुत्र जुनैद तांबोळी (Junaid Tamboli) याने 96 .40 टक्के गुण मिळवून घवघवीत  यश मिळवले आहे. जुनैद पुण्यातील अभिनव विद्यालय पुणे (Abhinav Vidyalay Pune) येथे शिकत होता. विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळवून मुळशी तालुक्यामध्ये (Mulshi Taluka) देखील प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान त्याने मिळवलेला आहे. (SSC Results)
जुनैदचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारणेवाडी या ठिकाणी झाले. तसेच 2023 चा आदर्श  विद्यार्थी म्हणून अभिनव विद्यालयामार्फत त्यास पुरस्कृत करण्यात आले. अभ्यासाबरोबरच जुनैद संगीत क्षेत्रामध्येही आपले नाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुवर्य जानकीराम जगताप यांच्याकडे तो तबलावादनाचे धडे घेत आहे. तबल्याच्या विशारद परीक्षेपर्यंत त्याने मजल मारलेली आहे. (SSC Exam Results)
जिद्द ,चिकाटी व अभ्यासातील सातत्य यामुळे त्याला यश मिळाले आहे, असे तो सांगतो. पुढे आय.ए.एस होऊन देशाची सेवा करण्याचा त्याचा मानस आहे. त्याच्याबद्दल सर्व स्तरातून  कौतुक व अभिनंदन होत असून कासारआंबोली गावचे सरपंच व समस्त ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले. (Pune News)
—-
जिद्द ,चिकाटी व अभ्यासातील सातत्य यामुळे मला हे यश मिळाले आहे. पुढे आय.ए.एस होऊन देशाची सेवा करण्याचा त्याचा मानस आहे.
जुनैद तांबोळी 
News Title | SSC Results | Junaid Tamboli of Kasaramboli stood first in Mulshi taluk in SSC examination