Pune Loksabha Election Voting | पुणे लोकसभा मतदार संघात २ हजार १८ मतदान केंद्रावर होणार मतदान

HomeBreaking Newsपुणे

Pune Loksabha Election Voting | पुणे लोकसभा मतदार संघात २ हजार १८ मतदान केंद्रावर होणार मतदान

गणेश मुळे May 11, 2024 2:24 PM

Voter List | Dr Suhas Diwase | मतदार यादीत कोणताही दोष नाही; तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती – डॉ सुहास दिवसे
Loksabha Election Model code of Conduct |  निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा |जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
Pune Traffic Update | १४ व १५ डिसेंबर रोजी सिंहगड घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद

Pune Loksabha Election Voting | पुणे लोकसभा मतदार संघात २ हजार १८ मतदान केंद्रावर होणार मतदान

| पुणे लोकसभेसाठी मतदार संघनिहाय निवडणूक साहित्याचे रविवारी वितरण

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेअंतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी सज्ज असून निवडणूक साहित्याचे सहा ठिकाणांहून मतदार संघनिहाय वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

वडगावशेरी मतदार संघातील साहित्य वितरण स्व. राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी, शिवाजीनगर मतदार संघासाठी बॅडमिंटन हॉल, कृषी महाविद्यालय, कोथरुड मतदार संघासाठी विश्वशांती गुरुकुल विद्यालय, एमआयटी संस्था, पौड रोड, पर्वती मतदार संघासाठी शेठ दगडुराम कटारिया महाविद्यालय, महर्षीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट साठी बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैदान, पुणे पोलीस आयुक्तालयाशेजारी आणि कसबा पेठ मतदार संघासाठी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट याठिकाणी साहित्य वितरण होणार आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात २ हजार १८ मतदान केंद्रावर मतदान होणार असून १३ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सहा विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांवर २ हजार २४५ केंद्राध्यक्ष, २ हजार ८७६ प्रथम मतदान अधिकारी व ६ हजार ५५ इतर मतदान अधिकारी असे एकूण ११ हजार १७६ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये वडगाव शेरी मतदार संघासाठी २ हजार १११, शिवाजीनगर २ हजार ८५०, कोथरुड १ हजार ६७४, पर्वती ९७८, पुणे कॅन्टोन्मेंट २ हजार ६३८ तर कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी ९२५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
0000