Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!

HomeपुणेBreaking News

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!

गणेश मुळे Jul 26, 2024 3:00 PM

Karnataka Election Results | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही २०२४ मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी | मोहन जोशी
MHADA | Stamp Duty Amenity Scheme | म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
PM SVAnidhi Scheme | PMC Pune | फेरीवाल्यासाठी महत्वाची बातमी | कर्ज वाटपासाठी बँकेत कॅम्प चे आयोजन

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!

 

Khadakwasla Dam – (The Karbhari News Service) – पुणे शहरात महापूर सारखी परिस्थिती निर्माण होण्यास पाटबंधारे विभाग कारणीभूत आहे. नागरिकांना न कळवता पाटबंधारे विभागाने जास्त पाण्याचा विसर्ग केला आणि पूरस्थिती उद्भवली. असा आरोप खासदार मुरलीधर मोहोळ आणि बऱ्याच राजकीय नेत्यांनी केला. यावर पाटबंधारे विभागाने आपला खुलासा सादर केला आहे. (Pune Rain News)

खडकवासला समुहातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्यावरील भागात २५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी झाली. या २४ तासांत ११८ ते ४५३.५ मी.मी. इतकी अचानक अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे खडकवासला धरण ते पुणे शहर या भागामध्ये १०८ ते १६७.५ मी.मी. इतका पाऊस झाला व तो विक्रमी स्वरुपाचा होता. त्यामुळे खडकवासला धरणातील मोठ्या प्रमाणातील येवा तसेच शहरातील नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. या अचानक आलेल्या पाऊसामुळे धरणातील विसर्ग सोडणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करुन नदीत पाणी सोडण्यात आले होते.

जलसंपदा विभागाने या संदर्भात सतत संनियंत्रण करुन पाणी सोडण्याची पुर्वसूचना २२ जुलै २०२४ पासून पुणे महानगरपालिका नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना देण्यात आली होती. जलसंपदा विभाग महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय राखण्यात आलेला आहे, असेही खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे पाटबंधारे मंडळ पुणे यांनी कळविले आहे.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाचे आवाहन

खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क आहेत. खडकवासला पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांच्या संपर्कात असून वेळोवेळी धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती अवगत करीत आहे.