Pune Ganesh Visarjan | PMC Pune | पुणे महापालिकेकडून बांधलेले हौद, टाक्यामध्ये ५ लाख ६१ हजार ४२८ गणेश मूर्तीचे विसर्जन 

HomeBreaking Newsपुणे

Pune Ganesh Visarjan | PMC Pune | पुणे महापालिकेकडून बांधलेले हौद, टाक्यामध्ये ५ लाख ६१ हजार ४२८ गणेश मूर्तीचे विसर्जन 

Ganesh Kumar Mule Sep 29, 2023 11:55 AM

Ganesh Visarjan Rath | PMC Pune | फिरत्या विसर्जन रथा बाबत पृथ्वीराज सुतार यांचा आक्षेप!
Ajit Pawar | Ganeshotsav 2023 | राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे | अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे
Atharvashirsha Pathan | सासवड येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

Pune Ganesh Visarjan | PMC Pune | पुणे महापालिकेकडून बांधलेले हौद, टाक्यामध्ये ५ लाख ६१ हजार ४२८ गणेश मूर्तीचे विसर्जन

| उपायुक्त संदीप कदम यांची माहिती

Pune Ganesh Visarjan | PMC Pune | गणेश उत्सव (Pune Ganeshotsav) कालावधीत पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधलेले हौद, एकूण २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्या याठिकाणी एकूण ५६१४२८ मूर्ती विसर्जन (Ganesh Idol Immersion) करण्यात आल्या. नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात आली होती. तसेच १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २५२ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे / मूर्ती दान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यानुसार ११०८२१ मुर्त्या दान (Ganesh Idol Donate) करण्यात आल्या. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी २५६ निर्माल्य कलश / कंटेनरची (Nirmalya Container) व्यवस्था करण्यात आल्याने एकूण ६२७६९७ किलो इतके निर्माल्य संकलन झाले. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Department)

पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागाची कामगिरी 

पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली.
• गणेशोत्सव २०२३ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये ECOEXIST संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व इतर विविध स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे. शाडू माती एक मर्यादित संसाधन
असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकारांना मूर्ती/माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या
केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.
• निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवू शेतक-यांना देण्यात येते, म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशा कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते.
• क्षेत्रिय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आली होती.
• सर्व क्षेत्रिय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणेबाबत सूचित करण्यात आले होते. वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयाकडून व सुरक्षा विभागाकडून रखवालदारांची नियुक्ती करण्यात आली होती.
– क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्यांची उपलब्धता मोटार वाहन विभागाकडून करण्यात आली. या गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी, मा. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मा. पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच यांना कळविण्यात आले होते.

– पुणे महानगरपालिकेमार्फत अग्निशामक दलाची सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात आली होती तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले होते. वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळनिहाय गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करण्यात आले.
– पुणे महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये एकूण ४०० मोबाईल टॉयलेट तसेच १५० फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली होती व  चंद्रकांतदादा पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचेमार्फत २०० पोर्टबल टॉयलेटस उपलब्ध करून देण्यात आले होते.
– पुणे महापालिकेने पुणे शहरामधील ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (CT/PT) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांना सोयीचे व्हावे या करिता टॉयलेटसेवा app मध्ये पुणे शहरामधील कुठलाही पत्ता टाकून पुणे महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे शोधता येतील अशी यंत्रणा राबविण्यात आली होती.
– पुणे शहरामधील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर्स लावण्यात आले होते. टॉयलेटसेवा app चा वापर करून नागरिकांनी या माहितीचा फायदा घ्यावा, सार्वजनिक स्वच्छतागृहांविषयीचा आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्समार्फत आणि अभिप्राय कळवावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले होते. त्याप्रमाणे नागरिकांनी या सुविधेचा वापर केल्याचे दिसून आले.