Ajit Pawar | Ganeshotsav 2023 | राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे | अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे

HomeपुणेBreaking News

Ajit Pawar | Ganeshotsav 2023 | राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे | अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे

Ganesh Kumar Mule Sep 25, 2023 2:03 PM

Gram Panchayats on Palkhi Marg | पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान
Chandrakant patil : मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील 
Republic Day 2025 Pune | भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

Ajit Pawar | Ganeshotsav 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट

राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे | अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे

Ajit Pawar | Ganeshotsav 2023 | पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह (Pune Manache Ganpati) विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडूदे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊदे असे मागणे श्रीगणेशाकडे मागितल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील राजाराम मित्र मंडळ, साने गुरूजी तरुण मंडळ येथे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
0000