Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली

HomeBreaking Newsपुणे

Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली

Ganesh Kumar Mule Sep 01, 2023 1:03 PM

Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत संयुक्त बैठक 28 ऑगस्ट ऐवजी 8 सप्टेंबरला
Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार
Social Security | Ganesh Mandal pune| सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली

Pune Ganesh Utsav | पुणे शहरातील या वर्षीचा गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबर चे कालावधीत साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने गणेशमंडळांनी व नागरिकांनी यावर्षीचे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा कसा करावा, याबाबत पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) नियमावली जाहीर करण्यात आली आहे.   या सूचनांचे व अटी शर्तीचे पालन करणेबाबत सर्व संबंधितांना पुणे महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन” करण्यात आले आहे. (Pune Ganesh Utsav)
 मागील वर्षांपासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीकरिता सन २०१९ चे सालामध्ये देण्यात आलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी व रनिंग मंडप इत्यादींच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. अशा परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
पुणे शहरात ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करावयाचा असेल अथवा पूर्वीच्या सन २०१९ मधील परवानगीची जागा प्रकल्प बाधित झाल्याने किंवा इतर कारणास्तव बदल करणे आवश्यक असल्यास नवीन जागेवरील सर्व परवानग्या सन २०१९ सालच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित क्षेत्रिय कार्यालय व पोलीस स्टेशन या कार्यालयामार्फत नव्याने आवश्यक ते सर्व परवाने घेणे बंधनकारक राहील. या परवानग्यांना पुणे मनपामार्फत कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही.
सर्व गणेश मंडळांनी सन २०१९ सालच्या अथवा नव्याने घेतलेल्या सर्व परवान्यांच्या प्रती मंडप/कमानीच्या दर्शनी भागात प्लास्टिक कोटिंगमध्ये सहजपणे दिसतील अशा ठिकाणी लावाव्यात.
उत्सव मंडपाची उंची ४० फुटापेक्षा नसावी. ४० फुटापेक्षा जास्तीचा उत्सव मंडप उभारायाचा असल्यास त्याकामी मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबेलिटी सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील.
 मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन गाड्या उदा. अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच प्रवासी बसेस इ. रहदारीकरिता लगतचे रस्ते मोकळे ठेवणे तसेच कमानीची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून १८ फुटापेक्षा जास्त राहील याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार स्वयंसेवक / सुरक्षारक्षक नेमावेत.
स्थापना करण्यात येणाच्या गणेशमूर्ती ह्या प्राधान्याने पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच वापराव्यात. संस्था/संघटना / मंडळे अथवा वैयक्तिक नागरिक यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना योगदान देऊन यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा.
• शहरातील गणेशोत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग, पुणे शहर तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी कळविण्यात आलेल्या सूचना/नियम अथवा आदेश यांचे सर्व गणेश मंडळांना पालन करणे बंधनकारक राहील.
उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी ३ दिवसांचे आत स्वखचनि सदरचे मंडप/स्टेज कमान / रनिंग मंडप/तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मुर्ती व अन्य साहित्य रस्त्यांवरून ताबडतोब हटवून घेणे तसेच रस्त्यावरील घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रेटमध्ये बुजवून मनपाची जागा सुस्थितीत करणे बंधनकारक राहील.
परवाना दिलेल्या जागेची पुणे महानगरपालिकेस जरूरी भासल्यास अथवा त्या जागेबाबतचा वाद /विवाद निर्माण झाल्यास देण्यात आलेला अधिकृत मंडप कमान / परवाना, उत्सव सुरु होण्याच्यापूर्वी रद्द करण्याचा मनपास हक्क राहील.
उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. १७३/२०१० मध्ये दिलेल्या सर्व आदेशांचे व त्या अनुषंगाने शासनाने परिपत्रकाद्वारे कळविलेल्या सर्वं सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करणे बंधनकारक राहील.
स्थानिक रहिवाश्यांना / पदपथांवरील पादचाऱ्यांना/ वाहनांना अडथळा होणार नाही, ध्वनीप्रदुषणाचा त्रास होणार नाही याची मंडळानी दक्षता घ्यावी.
उत्सव कालावधीत नागरिकांना तक्रारी करणेकरिता खालील माध्यमाद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा पुणे महानगरपालिकेतर्फे उपलब्ध केली आहे.
संकेतस्थळ :- http://complaint.punecorporation.org टोल फ्री नंबर 1800 103 0222 सर्व महा. सहा. आयुक्त कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल अँप PUNE Connect (PMC Care), Whatsapp NO – 9689900002, मुख्य अतिक्रमण कार्यालय संपर्क क्र.: ०२०-२५५०१३९८ ई-मेल-feedback@punecorporation.org, encroachment1@punecorporation.org • वरील माध्यमाद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निराकरण सर्व क्षेत्रिय कार्यालय स्तरावर तसेच सर्व स्थानिक पोलीस स्टेशनवर करण्यात येईल.
सण / उत्सवांचे कालावधीत कोणत्याही अडचणींबाबत गणेश मंडळ/ नागरीकांनी संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयांशी संपर्क साधावा. यावर्षी देखील गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मागील वर्षाप्रमाणेच सर्व क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मनपा मोकळ्या जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी परवानगी देणेची कार्यवाही मनपाच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत देखील पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या हंगामी व्यवसाय धारकांना सोडत पद्धतीने काही अटी/शर्तीवर ठराविक ठिकाणच्या जागा गाळे आधून व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.