Pune Congress Women Wing | पुण्यात महिला काँग्रेसचे आंदोलन ; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी

HomeBreaking News

Pune Congress Women Wing | पुण्यात महिला काँग्रेसचे आंदोलन ; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी

Ganesh Kumar Mule Feb 26, 2026 6:49 PM

PMC Pune Census | १६ मे ते १४ जून  या कालावधीत महापालिका पुण्यात करणार जनगणना!
Katraj – Kondhwa Road | गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या  पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
Pune PMC News | नाले सफाई व कल्व्हर्ट कामांचा आढावा; मान्सूनपूर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे निर्देश  

Pune Congress Women Wing | पुण्यात महिला काँग्रेसचे आंदोलन ; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी

 

Pune News – (The Karbhari News Service) – जगभरात चर्चेत असलेल्या एपस्टीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे नाव समोर आल्याचा आरोप करत पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज गुडलक चौक येथे आंदोलन करण्यात आले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून हरदीप सिंह पुरी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Pune Breaking News)

पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मा. स्वाती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना स्वाती ताई शिंदे यांनी सांगितले की, जगाला हादरवणाऱ्या आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी संबंधित प्रकरणात उच्चपदस्थ व्यक्तींची नावे समोर येत असताना त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अशा आरोपांनंतर संबंधितांनी माफी मागून राजीनामे दिले आहेत, मात्र भारतात अद्याप स्पष्ट भूमिका किंवा चौकशी दिसून येत नाही, ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

हरदीप सिंह पुरी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनात गीता चोरगे, मुक्ता शिंदे, सुरेखा मारणे, मनिषा करपे, तारा शर्मा, विद्या लवार्डे, ज्योती अडागळे, मनोरमा चौधरी तसेच मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: