Pune City Results | पुण्यातील आठही विधानसभा मतदार संघाचे निकाल जाणून घ्या
Pune City Results – (The Karbhari News Service) – पुणे शहरात महायुतीने आपले वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडीला अवघी एक जागा जिंकता आली आहे. वडगावशेरी ही एकच जागा महाविकास आघाडीला जिंकता आली आहे. यात देखील भाजपने आघाडी मारली आहे. भाजपने एकूण ६ उमेदवार दिले होते. हे सर्वही उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे भाजपसाठी हे यश खूप महत्वाचे मानले जात आहे.
-
सुनील कांबळे यांचा दणदणीत विजय
Pune Cantonment Assebmly Election Result 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसचे रमेश बागवे यांचा १०,३२० मतांनी पराभव करून मोठा विजय मिळवला आहे. ७६,०३२ मते मिळवत कांबळे यांनी मतदारसंघावर भाजपचा झेंडा पुन्हा फडकवला आहे. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे ६५,७१२ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
अंतिम आकडेवारी
सुनील कांबळे (भाजप): ७६,०३२ मते (+१०,३२० आघाडी) रमेश बागवे (काँग्रेस): ६५,७१२ मते
भाजपसाठी मोठा विजय
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही कांबळे यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला होता. यंदाही मतदारांनी भाजपवर आपला विश्वास कायम ठेवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. २० व्या फेरीच्या अखेरीस बागवे यांना १०,३२० मतांनी कांबळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी स्थानिक मुद्दे उपस्थित करत आणि जोरदार प्रचार करत मतदारसंघात काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या संघटित प्रचारयंत्रणेपुढे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
सुनील कांबळे यांच्या विजयासह भाजपने पुण्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांवर आपला कब्जा कायम ठेवला आहे. कसबा पेठ, पर्वती, शिवाजीनगर कोथरूड, खडकवासला, आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे.
चंद्रकांत पाटील यांचा मोठा विजय
kothrud Assembly Election Result 2024 : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी ९० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांच्यासोबत लढत होत असतानाही पाटील यांनी मतदारसंघात ९०,७६९ मतांचे प्रचंड मताधिक्य घेत भाजपच्या बालेकिल्ल्यास साजेसा विजय मिळवला आहे.
शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेची निराशा
कोथरूडमध्ये शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेने उमेदवार दिले होते. मात्र प्रमुख नेत्यांनीच प्रचाराकडे कानाडोळा केल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. भाजपसाठी महत्त्वाचा विजयपुण्यातील महायुतीच्या यशामुळे भाजपसाठी हा विजय केवळ स्थानिक नाही, तर राज्य पातळीवरही महत्त्वाचा मानला जात आहे. कोथरूडसह पुण्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मिळवलेले यश भाजप पक्ष संघटनेची ताकद अधोरेखित करत आहे.
माधुरी मिसाळ यांनी गड राखला
Parvati vidhan sabha assembly election result 2024 : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या विसाव्या फेरीअखेर मिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांच्यावर ५४,५१५ मतांची निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
सलग चौथी टर्म
माधुरी मिसाळ यांनी सलग चौथ्यांदा पर्वती मतदारसंघातून विजय मिळवला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात विरोधकांना यंदाही अपयश आले आहे. मिसाळ यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती, जी प्रत्येक फेरीत वाढत गेली. विरोधकांचा पराभवराष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांना प्रबळ विरोधक मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीमुळे कदम यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनीही निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर मतविभाजन झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला.
माधुरी मिसाळ यांच्या पर्वतीतील विजयाने भाजपचे या मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पर्वती मतदारसंघांमध्ये चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना १ लाख 17 हजार 887 हजार मतदान मिळाले. यामुळे पर्वतीत मंत्रिमंडळाची वर्दी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मिसाळ यांनी मंत्रिपद मिळाले असा विश्वास व्यक्त करीत पक्ष जे ठरवल ते मंत्रिपद घेऊन पर्वतीच्या जनतेच्या विकासासाठी यापुढे अधिक काम करणार असल्याचे सांगितले.
कसबा पेठ : भाजपने पुन्हा आपला गड खेचून आणला
Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कसबा पेठविधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना १९,४१३ मतांनी पराभूत करत विजयी मिळवला आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने या गडावर पुन्हा वर्चस्व मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला आहे.
भाजपसाठी प्रतिष्ठेचा विजय
कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने येथे विजय मिळवत भाजपला धक्का दिला होता. त्या पराभवाचे निवारण करत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.भक्कम आघाडीची सुरुवातमतमोजणीच्या सुरुवातीपासूनच हेमंत रासने यांनी मोठी आघाडी घेतली होती. फेरी दर फेरीत त्यांनी आपले मताधिक्य वाढवत ठेवले. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी झुंज दिली, मात्र अखेर रासने यांनी विजय मिळवला.धंगेकरांचा पराभवरवींद्र धंगेकर यांना काँग्रेसच्या पराभवाचा सामना करावा लागला. पोटनिवडणुकीतील विजयाच्या पुनरावृत्तीचा काँग्रेसचा प्रयत्न फोल ठरला. भाजपने पुन्हा एकदा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आपला ठसा उमटवला आहे.
बापू पठारे यांना राम कृष्ण हरी ने दिली साथ
Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live Updates : पुण्याच्या वडगाव शेरी मतदार संघातून शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाली आहेत. अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली आहे. बापू पठारे अवघ्या 5000 मतांनी विजयी झाले आहेत. चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला आहे.
पुण्याच्या वडगाव शेरीत अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरु होती. मुळीक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेच पराभवाचं कारण असल्याची शक्यता आहे. तसेच टिंगरे यांच्याबाबत पोर्शे अपघात प्रकरण नडले का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. आता रिंगणार टिंगरे व पठारे असे दोन आजी-माजी आमदार हेच प्रमुख उमेदवार होते. त्यांच्यात लढत झाली. टिंगरे यांना पोर्शे कार अपघात प्रकरण नडणार की त्यांनी केलेली विकासकामे त्यांना तारणार?, पठारे यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे त्यांना विजय मिळवून देतील की ऐनवेळी पक्षांतर करणे त्यांना त्रासदायक ठरेल यावरून विजय ठरणार होता. अखेर बापू पठारे विजयी झाले आहेत. इथं क्लिक करा >>महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ पठारे यांना विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जोरावर मी ही निवडणूक जिंकणार आहे. आमच्या विरोधात उमेदवार कोण आहे त्याची आम्हाला काही देणे घेणे नाही. फक्त विकास हा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. आणि विकासाचा हाच मुद्दा आम्हाला निवडणूक जिंकून देणार आहेत. मुळात ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. जनतेनीच ठरवले की त्यांना बापूसाहेब पठारे आमदार हवाय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
टिंगरे २०१९ चे विजयी उमेदवार वडगाव शेरी मतदार संघातून सुनील टिंगरे २०१९ साली निवडून आले होते. त्याठिकाणी बापू पठारे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. बापू पठारे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ३० ते ४० हजारांच्या फरकाने निवडून आले होते. तर २०१४ ला तिसऱ्या नंबरवर राहून पराभूत झाले होते. २०१९ मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. तेव्हा टिंगरे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते.
——-
हडपसर मध्ये अजित पवार यांचा शिलेदार
Hadapsar assembly election Results: पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी मुख्य लढत पहायला मिळाली. येथून मनसेने देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. तर अपक्ष गंगाधर बधे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या मतदारसंघात सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत.यंदा ते पुन्हा विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली होती.मात्र अजित पवारांच्या शिलेदाराचा चेतन तुपे यांचा हडपसरमध्ये विजय झाला आहे. विधानसभेच्या जागावाटपावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही हडपसर विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळाली होती.अखेर येथून महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांना संधी दिली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांनी येथून विजय मिळवला आहे. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चेतन तुपे सहा हजार मतांनी विजयी झाले आहेत.
——-
सिद्धार्थ शिरोळे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय
शिवाजीनगरचा गड राखण्यात भाजपला यश आले आहे. विद्यमान आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. यावेळी तब्बल ३६ हजार ८१४ मतांनी विजय मिळविला आहे. मागील वेळी (२०१९) ५ हजार १२४ मतांनी विजय मिळविला होता.त्यावेळी वंचितला १० हजारहून अधिक मते मिळाली होती. मात्र, यावेळी विजयाच्या मताधिक्यात घसघशीत वाढ झाली आहे.शिरोळे यांना ८४ हजार ६८५ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांना ४७ हजार ८७१ मते मिळाली. त्यांची मते मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहेत. त्यांना मागील वेळी ५३ हजार ६०३ मते मिळाली. खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष कॉंग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांना १२ हजार ८७६ इतकी मते मिळाली.
महायुतीच्या कल्याणकारी योजना, आत्तापर्यंत केलेली विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क यामुळे ऐतिहासीक विजय मिळवला आहे. येत्या काळात कामाला गती देणार आहे. मतदार संघातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. मतदारसंघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल. शिवाजीनगर मतदार संघ विकासाचे स्मार्ट मॉडल बनवणार आहे.
– सिद्धार्थ शिरोळे, विजयी उमेदवार, शिवाजीनगर मतदारसंघ
भीमराव तापकीर यांनी मिळवला विजय
Khadakwasla Assembly Constituency Election Results | पहिल्या काही फेऱ्यांमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन दोडके आघाडीवर होते. सचिन दोडके हे महाविकास आघाडीचे उमेदवार. दरम्यान, खडकवासलात सचिन दोडके (राष्ट्रवादी – एसपी), भीमराव तापकिर (भाजप), मयूरेश वांजळे (मनसे) अशी तिरंगी लढत झाली. खडकवासला विधानसभा मतदार संघात तिसऱ्या फेरीत भीमराव तापकीर यांनी आघाडी घेत आपला विजय खेचून आणला.
COMMENTS