Pune Airport Advisory Committee | विमानतळ सल्लागार समितीत पाच जणांच्या नियुक्त्या !  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विमानतळ प्राधिकरणाकडे पाच नावे सुपूर्द

Homeadministrative

Pune Airport Advisory Committee | विमानतळ सल्लागार समितीत पाच जणांच्या नियुक्त्या ! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विमानतळ प्राधिकरणाकडे पाच नावे सुपूर्द

Ganesh Kumar Mule Jan 23, 2025 9:20 PM

River Revival Project | जुन्या व दुर्मिळ वृक्षांबाबत पुणे महापालिकेला करावा लागला खुलासा | नेमके काय आहे प्रकरण?
Union Budget 2025 | अपेक्षेप्रमाणे निराशाजनक अंदाजपत्रक देशाच्या आर्थिक भविष्याबाबत चिंता वाढू लागली – मोहन जोशी
Smart City pune | डबल डेकर बस सुरु करण्याची तयारी पूर्ण करा

Pune Airport Advisory Committee | विमानतळ सल्लागार समितीत पाच जणांच्या नियुक्त्या !

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विमानतळ प्राधिकरणाकडे पाच नावे सुपूर्द

 

Pune International Airport – (The Karbhari News Service) – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सल्लागार समिती (Pune International Airport Advisory Committee) केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडून पाच जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात सुधीर मेहता, अभिजीत पवार, अखिलेश जोशी, अमित परांजपे आणि अनिल टिंगरे यांचा समावेश आहे. मोहोळ यांनी खासदार या नात्याने या सर्वांची नावे भारतीय विमानतळ प्राधिकरणाला कळवली होती. (Pune News)

विमानतळावरील सेवा आणि सुविधा या प्रवासी केंद्रीत असाव्यात या उद्देशाने विमानतळ सल्लागार समिती कार्यरत असते. केंद्रीय मंत्री मोहोळ यांना या समितीसाठी पाच नावे सुचवण्याचा अधिकार असून या अधिकाराद्वारे मोहोळ यांनी ही नावे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालकांकडे सुपूर्द केली आहेत.

या निवडीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारे अमित परांजपे म्हणाले, पुणे विमानतळावर सोईसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून येत्या वर्षभरात धावपट्टीचा विस्तारही होत आहे. या पार्श्वभूमीवर या समितीत काम करण्याची संधी मिळणे निश्चितच महत्त्वाचे आहे. प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या समितीत कार्यरत राहणार असून ही संधी दिल्याबद्दल मोहोळ यांचे मनःपूर्वक धन्यवाद