Pulse Polio : 2 लाख 61 हजार 229 बालकांना पल्स पोलिओ डोस   : पुणे महापालिका आरोग्य विभागाची माहिती 

HomeपुणेPMC

Pulse Polio : 2 लाख 61 हजार 229 बालकांना पल्स पोलिओ डोस  : पुणे महापालिका आरोग्य विभागाची माहिती 

Ganesh Kumar Mule Feb 28, 2022 4:27 AM

PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार 
Standing Commitee : Hemant Rasane : स्थायी समिती बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या
Smart Identity Card | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘स्मार्ट ओळखपत्र’ अनिवार्य  | 10 ते 13 लाखाचा होणार खर्च 

2 लाख 61 हजार 229 बालकांना पल्स पोलिओ डोस

: पुणे महापालिका आरोग्य विभागाची माहिती

पुणे : शहरातील शून्य ते पाच वर्षे वयाच्या 2 लाख 61 हजार 229 बालकांना रविवारी पल्स पोलिओ लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या हस्ते नारायण पेठेतील कै. कलावती मावळे दवाखन्यात करण्यात आला. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

यावेळी डॉ. वैशाली जाधव, डॉ. अंजली साबणे, डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील, मुख्य लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर आणि लसीकरण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयाच्या 2 लाख 61 हजार 229 बालकांना लस देण्यात आली. यासाठी 1 हजार 425 बुथ लावण्यात आले होते. या मोहिमेत 4 हजार 180 कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्थानक, बसस्थानक याठिकाणी 70 ट्रान्झिट टीम ठेवल्या होत्या.


या एक दिवसाच्या मोहिमेत ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही त्या बालकांना आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओ डोस देणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0