PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 भरून देण्याची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवा
| माजी नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मागणी
PT 3 form | Pune Property tax | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर आकारणी विभागाचे फॉर्म PT-3 (PMC Property tax Department PT 3 Form) भरून देण्याची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपत आहे. ही मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी आणि नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (PMC Property tax Department)
माजी नगरसेवकांच्या निवेदनानुसार आम्ही पहिल्यापासून ही भूमिका घेतली होती कि महानगरपालिकेकडे सर्वच्या सर्व करदात्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या कडून फॉर्म भरून निष्कारण वेळेचा अपव्यय करू नका. तरी देखील कर आकारणी प्रशासनाने हा अनावश्यक फॉर्म भरून घेण्याचा अट्टाहास आणि आग्रह धरला. आता सणासुदीचे दिवस आहेत 15 नोव्हेंबर हा ऐन दिवाळीचा दिवस आहे. आमची आपणास विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवावी.
दरम्यान पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे. (PMC property Tax)
वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना दि. ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज (PT 3application form) संपूर्ण पुराव्यांसह दि. १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन (pmc pune property Tax department) खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. (Pune property tax)