Prithviraj B P IAS | अतिरिक्त आयुक्तांनी सर्व खात्यांकडून मागवली सुधारित आकृतीबंधाची माहिती!
PMC Recruitment Rules – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतिबंधानुसार आपल्या अधिनस्त विभागाकडील माहिती सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. (Pune PMC News)
पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ ला व सुधारित आकृतिबंधास महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. मे. राज्य शासनाच्या ३० जून २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार तेवीस ग्रामपंचायतीचे क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वाढ झालेली आहे. त्यानुषंगाने सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात असलेल्या शासन मान्य आकृतिबंधामधील विविध विभागाकडील शेड्युलमान्य पदसंख्ये मध्ये अधिक पदसंख्येची पदे निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानुसार विविध विभागाकडील अद्ययावत माहिती ७ दिवसात सादर करण्यात यावी. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
ही माहिती सादर करायची आहे
पदनाम
मंजूर पदांची संख्या
भरलेली पदांची संख्या
रिक्त पदांची संख्या
नव्याने निर्माण करायाची अतिरिक्त पदांची संख्या
COMMENTS