प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारीला होणार सादरीकरण
ओबिसी जागांवरील निवडणूक खुल्या गटातून होणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा आत्ता संपली आहे. पुण्याच्या प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे आता प्रभाग रचना जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या समक्रमांकाच्या दि. ३ नोव्हेंबर, २०२१ च्या पत्रान्वये प्रभाग रचनेचेकच्चे प्रारुप तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यास अनुसरुन आपण प्रभाग रचनेचे कच्चे प्रारुप तयार असल्याचे राज्य निवडणूक आयोगास कळविले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सदर प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर सदर प्रस्तावामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निकषानुसार काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या.
शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे
निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.
उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन सर्व प्रभागांना सर्वसाधारण महिलांचे आरक्षण उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सोडत काढण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीकरिता सुधारीत आदेश दि. २८ डिसेंबर, २०२१ रोजी जारी केले आहे. सदर आदेशानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा संपूर्ण प्रस्ताव तयार करुन खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्य निवडणक आयोगास मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
COMMENTS