Pratibha Patil PMC | मतदान केल्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार अहवाल!
| उपायुक्त प्रतिभा पाटील यांचे आदेश
Pratibha Patil PMC – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ (Pune Loksabha Election 2024) साठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केलेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना उपायुक्त प्रतिभा पाटील (Deputy Commissioner Pratibha Patil) यांनी दिल्या आहेत. याबाबत नुकतेच आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
मतदारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मतदान करावे याकरिता त्यांना प्रोत्साहित करणे व त्यांच्यामध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करणेसाठी जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांचेकडून आवाहन करण्यात आले होते. मतदारांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कुटूंबासहित सर्वानी मतदान करणेबाबत खातेप्रमुख स्तरावर आवाहन करण्यात यावे. असे आदेशात म्हटले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संदर्भ सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे.
तरी खातेप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान केलेबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन कार्यालयाकडे 16 मे पर्यंत पाठवावा. असे उपायुक्त पाटील यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.