Pramod Nana Bhangire | केशवनगर नदीपात्रात अवैध मलबा टाकण्याचा प्रकार गंभीर; तात्काळ फौजदारी कारवाईची शिवसेनेची मागणी

HomeBreaking News

Pramod Nana Bhangire | केशवनगर नदीपात्रात अवैध मलबा टाकण्याचा प्रकार गंभीर; तात्काळ फौजदारी कारवाईची शिवसेनेची मागणी

Ganesh Kumar Mule Feb 26, 2026 8:26 PM

Security guards | contract workers | मनपा सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगारांवरीलअन्याय सहन करणार नाही | कामगार नेते सुनील शिंदे
  PMC  commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट मिळकतींवर बिगर घरगुती दराने आकारण्यात येणाऱ्या करास विरोध
Kasba By-Election | कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु  | महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र 

Pramod Nana Bhangire | केशवनगर नदीपात्रात अवैध मलबा टाकण्याचा प्रकार गंभीर; तात्काळ फौजदारी कारवाईची शिवसेनेची मागणी

| पावसाळ्यापूर्वी पूरस्थितीचा धोका वाढणार – पर्यावरणीय नुकसानाचे मूल्यांकन करून विशेष पथक नेमावे

 

Pune Shivsena – (The Karbhari News Service) – हडपसर मतदारसंघातील केशवनगर परिसरातील नदीपात्रात शेकडो ट्रकभर बांधकामाचा राडारोडा व मलबा टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध कृत्यामुळे संबंधित नदीपात्र मोठ्या प्रमाणावर भरले गेले असून, नैसर्गिक जलप्रवाह अडथळित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात आली आहे. (Pune Breaking News)

शहरात सध्या पुणे नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत असताना दुसरीकडे नदीपात्रात अवैध मलबा टाकण्याचे प्रकार सुरू राहणे अत्यंत चिंताजनक असल्याचे शिवसेनेने नमूद केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नदीपात्र अरुंद व उथळ झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढणार असून, त्याचा फटका केशवनगरसह परिसरातील नागरिकांना बसू शकतो. यामुळे भूजल पातळी, जैवविविधता आणि एकूण पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “केशवनगरमधील नदीपात्रात शेकडो ट्रक मलबा टाकण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. शहराच्या जाहीरनाम्यात पर्यावरण संवर्धनाचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता कृतीतून आपली बांधिलकी सिद्ध करावी. संबंधित विकासक व जबाबदार व्यक्तींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. पर्यावरणीय नुकसानीचे वैज्ञानिक मूल्यांकन करून कठोर दंडात्मक कारवाई करावी. तसेच नदीपात्रातील सर्व मलबा तातडीने हटविण्यासाठी विशेष पथक नेमावे. शिवसेना पर्यावरण संरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असून, नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ती तीव्र भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही.”

शहरातील हजारो पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या प्रकाराची दखल घेत प्रशासनावर दबाव आणावा, असे आवाहनही शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. नदीपात्रांवरील अतिक्रमण व अवैध मलबा टाकण्याच्या घटनांकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात जलप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: