Pramod Nana Bhangire | भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामाच्या भव्य पुर्णाकृती शिल्पाचा पायाभरणी सोहळा उत्साहात साजरा

HomeपुणेBreaking News

Pramod Nana Bhangire | भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामाच्या भव्य पुर्णाकृती शिल्पाचा पायाभरणी सोहळा उत्साहात साजरा

कारभारी वृत्तसेवा Dec 03, 2023 11:38 AM

PMC Pune Employees |  Pune municipal employees regret that injustice is being done to the clerical cadre
Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा! | अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव 
New Parliament Building | Vinayak Deshpande | नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे नेतृत्व करणारे पुण्याचे सुपुत्र विनायक देशपांडे यांचा रविवारी सत्कार

Pramod Nana Bhangire | भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामाच्या भव्य पुर्णाकृती शिल्पाचा पायाभरणी सोहळा उत्साहात साजरा

 

भारतातील सर्वात मोठ्या प्रभू श्रीरामांच्या पुर्णाकृती शिल्पाची पायाभरणी सोहळा काल शनिवार, दि. ०२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०७ : ०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक आणि सांस्कृतिक वसा जोपासण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक तथा शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख, प्रमोद नाना भानगिरे यांनी २०१८ मध्ये पुणे महानगरपालिकेकडे भारतातील सर्वात पहिले प्रभू श्रीरामाचे पुर्णाकृती शिल्प उभारण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव दिला होता.

सार्वजनिक ठिकाणी प्रभू श्रीरामांचे शिल्प उभारण्यासाठी नगरविकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर आता हांडेवाडी येथील श्रीराम चौकात प्रभू श्रीरामांचे पुर्णाकृती शिल्प उभारले जाणार आहे. त्यामुळे अशा अनेक अडचणींवर मात करून या शिल्पाला महापालिकेकडून मान्यता मिळाल्याने या शिल्पाच्या पायाभरणी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

तसेच या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजीराव शिंदे यांच्या नावाने वाचनालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून, शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेना मुख्य प्रतोद तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वढू तुळापूरला होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वधु तुळापूरच्या विकास कामासाठी लागणाऱ्या ४०० कोटी निधी दिला असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना प्रमोद नाना भानगिरे हे २०० कोटींचा निधी पहिल्यांदाच प्रभागात आणलेला एकमेव नगरसेवक असल्याचे बोलून दाखवले. याचसोबत त्यांनी येणाऱ्या निवडणूकीत महायुतीच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान, शिवसेना प्रतोद आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी, देशात श्रीरामाच्या मंदिराला विरोध असताना तो विरोध मोदींनी मोडून काढला असे वक्तव्य केले.

याचसोबत गोगावले यांनी येणाऱ्या काळात हडपसर मध्ये ३० ते ३५ फुट उंच विठ्ठल मंदिराची स्थापना करून, संत सृष्टी तयार करणार असल्याचे सांगितले. त्यांनतर येत्या काळात लवकरच महंमदवाडी गावाचे महादेववाडी होणार असल्याचे सांगितले. तसेच, यावेळी त्यांनी लेक लाडकी योजना, महात्मा फुले योजनेत केलेली निधीवाढ याची माहिती दिली.

दरम्यान, या समारंभास शिवसेना जिल्हाप्रमुख रामेशबाप्पू कोंडे युवासेना सचिव मा. किरणजी साळी ,युवासेना जिल्हाप्रमुख मा. निलेश घारे, मा. तुषार हंबीर, युवासेना शहरप्रमुख मा. निलेश गिरमे, गोरक्षक शरद मोहळ, आध्यात्मिक आघाडीचे ह. भ. प. अक्षय महाराज भोसले, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख पुजाताई रावेतकर तसेच शिवसेना पुणे शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य आणि सकल हिंदू समाज तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.