Pramod Nana Bhangire | शिक्षण मंडळातून शाळेच्या मान्यतेची फाईल चोरी | पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराला काळीमा |शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

Homeadministrative

Pramod Nana Bhangire | शिक्षण मंडळातून शाळेच्या मान्यतेची फाईल चोरी | पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराला काळीमा |शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Jul 25, 2026 5:36 PM

Road Digging | NCP | रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन
Argentina world champions | फिफा विश्वचषक ट्रॉफी सोन्याची आहे का?  किती किंमत असेल? जाणून घ्या 
Metro | Smart City | SRA | गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा |मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Pramod Nana Bhangire | शिक्षण मंडळातून शाळेच्या मान्यतेची फाईल चोरी | पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराला काळीमा |शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयातून शाळेच्या मान्यतेची महत्वाची अधिकृत फाईल गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी तीव्र शब्दात प्रशासनावर टीका केली असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. (PMC Education Department)

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, शाळेच्या मान्यतेची अधिकृत फाईल शिक्षण मंडळातून गायब होणे म्हणजे साधी चूक नाही, तर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून झालेली गंभीर चोरी आहे.

एका शाळेचे भवितव्य ठरवणारी कागदपत्रे ज्या ठिकाणी सुरक्षित असायला हवीत, त्याच ठिकाणाहून ती गायब होणे ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. यातून महापालिका प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि कागदपत्रे जपण्याच्या पद्धतीचा ढिसाळपणा उघड झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

 अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

भानगिरे यांनी प्रशासनाला 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत. पहिली म्हणजे गायब झालेली फाईल तात्काळ शोधून काढावी आणि दुसरी म्हणजे या चोरीमागे असणाऱ्यांना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

फाईल दडपण्याचा किंवा दोषींना पाठीशी घालण्याचा प्रत्येक प्रयत्न शिवसेना चिरडून टाकेल, असा इशाराही त्यांनी दिला. फाईल सापडली नाही आणि चोरट्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर पुणे महानगरपालिकेला शिवसेनेच्या तीव्र जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल. गाठ शिवसेनेशी आहे, असे भानगिरे म्हणाले.

या प्रकरणाबाबत शिवसेनेकडून एक पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात शिक्षण मंडळातील कर्मचारी फाईल घेऊन पळत असल्याचे व्यंगचित्र दाखवण्यात आले असून फाईल चोरली एकदाची असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे महापालिकेच्या कारभारावरून नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, उपस्थिती नोंद आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी पालक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडूनही होत आहे.

महापालिका प्रशासनाने अद्याप या प्रकरणी अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र, ही फाईल सापडते का आणि दोषींवर कारवाई होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: