Pune Rain | 39 वॉटर लॉगिंग स्पॉटसाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

Homeadministrative

Pune Rain | 39 वॉटर लॉगिंग स्पॉटसाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 8:19 PM

PMC Schools | महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा | आयुक्त विक्रम कुमार 
PMC Arogyawardhini Center | महापालिका आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय | स्थायी समितीत झाली चर्चा 
PMC Building Parking | महापालिका नवीन इमारतीतील पार्किंग व्यवस्था नवीन सभासदांसाठी राखीव | प्रशासनाच्या प्रायोगिक तत्वाने कर्मचारी मात्र हैराण!

Pune Rain | 39 वॉटर लॉगिंग स्पॉटसाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा – स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – शहरातील 39 वॉटर लॉगिंग स्पॉटसाठी कामाची सद्यस्थिती, त्यावरील कायमस्वरूपी उपाययोजना, आपत्कालीन उपाय यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि नियमितपणे आढावा घ्यावा असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी आज प्रशासनाला दिले. (Shrinath Bhimale PMC)

भिमाले म्हणाले, शहरातील 39 वॉटर लॉगिंग स्पॉट्सपैकी अनेक ठिकाणी अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण झालेल्या नाहीत. मान्सूनपूर्वी वाहतूक पोलिसांनी संबंधित विभागांना सूचना देऊनही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असून त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ते खचणे, खड्डे आणि विविध विकासकामे अपूर्ण राहिल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने तात्पुरत्या उपाययोजनांवरच भर दिला जात असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणली.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील 39 वॉटर लॉगिंग पॉईंट्सपैकी किती ठिकाणी कायमस्वरूपी कामे पूर्ण झाली आहेत, उर्वरित कामांची सद्यस्थिती काय आहे, ती कोणत्या टप्प्यात आहेत आणि पूर्णत्वाची निश्चित मुदत काय आहे, याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

भिमाले यांनी स्मार्ट सेन्सर, पंपिंग स्टेशन आणि रिअल-टाईम मॉनिटरिंग प्रणाली किती ठिकाणी कार्यरत आहे, याचाही आढावा घेण्याचे निर्देश दिले. तसेच पावसापूर्वी आणि पावसानंतर तातडीने पाणी उपसण्यासाठी आवश्यक पंप, यंत्रसामग्री आणि आपत्कालीन पथके प्रत्येक संवेदनशील ठिकाणी उपलब्ध ठेवण्यावर भर दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: