PMRDA Ward Office | नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु!

Homeadministrative

PMRDA Ward Office | नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु!

Ganesh Kumar Mule Oct 10, 2025 7:10 PM

NCP Pune latest news | Sharad pawar पुणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काय चाललंय? सगळे पदाधिकारी राजीनामा देणार? 
Non teaching staff | Agitation | मनपा शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Recruitment | PMC Pune | पुणे महापालिका भरती | महापालिकेकडून नवीन उमेदवारांच्या हंगामी नेमणुका! | आता लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

PMRDA Ward Office | नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु!

 

PMRDA News – (The Karbhari News Service) – स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या / अडचणी निकाली काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तालुकानिहाय नव्याने ९ क्षेत्रीय कार्यालय सुरू केली आहे. त्यामुळे नागरी समस्या आणि बांधकाम परवानगीबाबतचे प्रश्न आता संबंधित तालुकानिहाय सुटणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (PMRDA Pune)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत ९ तालुक्यातील ६९७ गावांचा कारभार चालतो. या गावातील नागरिकांचे प्रश्न तसेच बांधकाम परवानगीबाबतच्या कामकाजासाठी संबंधितांना मुख्य कार्यालय आकुर्डी / औंध या ठ‍िकाणी यावे लागत होते. यामुळे नागरिकांचा अधिक वेळ जात असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याची दखल घेत पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ९ तालुक्यात क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता तालुका कार्यालयातून संबंध‍ित तालुक्याचे कामकाज पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाच्या सभेत यास मान्यता दिली होती. या निर्णयामुळे शक्यतो नागरिकांना आता पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी आणि पुण्यातील औंधमधील कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.

या तालुकानिहाय क्षेत्रीय कार्यालयासाठी अपेक्षित मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात अभियंता, सहाय्यक महानगर नियोजनकार, लिपिक, शिपाई आदी मनुष्यबळाचा समावेश असून पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील ९ तालुक्यात क्षेत्रीय कार्यालयात कामकाज सुरू झाले आहे. पीएमआरडीएच्या विभागप्रमुखांनी संबंध‍ित कार्यालयाच्या कामकाजसंबंधी नुकत्याच भेटी दिल्या आहेत. या क्षेत्रीय कार्यालयामुळे पीएमआरडीए हद्दीतील नागरिकांचे प्रश्न, अडचणी आणि बांधकाम परवानगीबाबतचे काम आता तालुकानिहाय होत असल्याने याचा संबंधितांना लाभ घेता येईल.

या ठिकाणी कार्यालये

नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडव‍िण्यासाठी चाकण (ता. खेड), तळेगाव (ता. मावळ), वाघोली (ता. हवेली १), औंध (ता. हवेली २), यवत (ता. दौंड), शिक्रापूर (ता. शिरूर), नसरापुर (ता. भोर), सासवड (ता. पुरंदर), चांदे (ता. मुळशी), नसरापुर (ता. वेल्हे) या ठिकाणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची तालुका स्तरावर क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: