PMRDA | पंधरा दिवसात रस्त्याचे काम करण्याचा अल्टिमेटम
| पीएमआरडीएच्या आयुक्तांनी बजावली पीआयटीसीएमआरएलला नोटीस
Dr Yogesh Mhase IAS – (The Karbhari News Service) – माण- हिंजवडी शिवाजीनगर या परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी माण हिंजवडी ते शिवाजीनगर या बांधा वापरा हस्तांतरीत करा, या तत्वावर राबविण्यात येणाऱ्या मेट्रो लाइन ३ चे सवलतकार पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएलला) यांना नोटीस बजावली आहे. यात संबंधितांना पंधरा दिवसात कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पीआयटीसीएमआरएलकडे माण- हिंजवडी ते शिवाजीनगर या भागातील रस्त्याची बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून संबंधित भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांसह वाहनधारक त्रस्त आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित सवलतकार सवलतकार पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड यांना गुरुवारी (दि.५) नोटीस बजावली. यात आगामी पंधरा दिवसात अपेक्षितरित्या रस्ता दुरुस्त करण्याचा अल्टिमेटम पीआयटीसीएमआरएलला नोटीसद्वारे दिला. संबंधित कालावधीत तर काम पूर्ण झाले नाही तर मेट्रोचे सेक्शन १ मधील काम थांबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
COMMENTS