PMRDA | UDCPR | जोपर्यंत पीएमआरडीए ला UDCPR लागू होत नाही तोपर्यंत केसेस पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने कराव्यात | नागरी हक्क संस्थेची सरकार कडे मागणी
Pune PMRDA News – (The Karbhari News Service) – जोपर्यंत पीएमआरडीए ला UDCPR लागू होत नाही तोपर्यंत केसेस पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने कराव्यात, अशी मागणी नागरी हक्क संस्थेचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. (Sudhir Kulkarni Nagri Hakka Sanstha)
कुलकर्णी यांच्या निवेदन नुसार गेले १ महिना पीएमआरडीए मध्ये आर्किटेक्ट आणि बिल्डर्स यांच्या कडून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवेश बंद केला आहे. फक्त आर्किटेक्ट यांना च प्रवेश देण्यात येत आहे.यामुळे आर्किटेक्ट यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच कामाला विलंब लागत आहे. आर्किटेक्ट पूर्ण महाराष्ट्र भर काम करत असतात त्यामुळे त्यांनी काही कर्मचारी हे परवानगीच्या कामास मदतीसाठी घेतली असतात पीएमआरडीए सोडून सर्व सक्षम प्राधिकरणामध्ये आर्किटेक्ट यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र पाहून काम करण्यास परवानगी आहे.
या प्रवेश बंदी मुळे रोजगार गमावण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर येणार आहे. तसेच सर्व परवानगीच्या कामास विलंब होणार आहे. कुलकर्णी यांनी पुढे म्हटले आहे कि, परवानगीची कामे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू ठेवण्याबाबत कळवले आहे जेव्हा की तिथे असलेले सॉफ्टवेअर हे पूर्णपणे नवीन UDCPR नुसार बनवले आहे. परंतु पीएमआरडीए मधील पुणे मनपा मध्ये समाविष्ट गावे सोडून उर्वरित क्षेत्रात पीएमआरडीए चे नियम लागू आहेत. तिथे UDCPR लागू नाही. जिथे UDCPR लागू आहे तिथे सदर सॉफ्टवेअर नुसार काम करण्यास हरकत नाही परंतू जिथे पीएमआरडीए नियम लागू आहेत तिथे ऑफलाईन केस करताना ऑनलाईन केस पण करावी लागत आहे ज्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. तरी जोपर्यंत पीएमआरडीए ला UDCPR लागू होत नाही तोपर्यंत केसेस पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने कराव्यात. असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

COMMENTS