PMRDA Lottery | दोन हजार जणांची सदन‍िकेसाठी नोंदणी | पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; एकूण 1337 सदनिकांची लॉटरी

Homeadministrative

PMRDA Lottery | दोन हजार जणांची सदन‍िकेसाठी नोंदणी | पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; एकूण 1337 सदनिकांची लॉटरी

Ganesh Kumar Mule Oct 25, 2024 7:53 PM

Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन
PMRDA | PMRDA च्या बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती | उद्योग मंत्री उदय सामंत
Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता 

PMRDA Lottery | दोन हजार जणांची सदन‍िकेसाठी नोंदणी | पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; एकूण 1337 सदनिकांची लॉटरी

 

PMRDA News – (The Karbhari News Service) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ येथील आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला असून त्यास प्रत‍िसाद म‍िळत आहे. यात २४ ऑक्टोबरपर्यंत जवळपास दोन हजार नागर‍िकांनी प्राथम‍िक नोंदणीची प्रक्रिया संबंध‍ित संकेतस्थळावर केली आहे. (Pune News)

पीएमआरडीएअतंर्गत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१ BHK) प्रवर्गातील ४७ सदनिका व LIG (२ BHK) प्रवर्गातील ६१४ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील EWS (१ RK) प्रवर्गात ३४७ सदनिका तसेच LIG (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरी काढण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागव‍िण्यात येत आहे. यात १२ ते २५ ऑक्टोबर २०२४ दुपारी चारपर्यंत एक हजार ९३२ जणांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. यात २९९ नागर‍िकांनी पर‍िपुर्ण अर्ज भरले असून २१८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून त्यांचे परिपूर्ण अर्ज पीएमआरडीएला प्राप्त झाले आहे. उर्वर‍ित अर्ज कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी अर्जदारांकडून पुर्णपणे भरलेले नाही. परंतु, त्यांची प्राथम‍िक नोंदणीची झाली आहे.

कागदपत्रांची पडताळणी

पीएमआरडीएअतंर्गत काढण्यात आलेल्या सदन‍िकेच्या लॉटरीसाठी नागर‍िकांचा प्रत‍िसाद म‍िळत आहे. यात गत १३ द‍िवसात (२४ ऑक्टोबरपर्यंत) एक हजार ९३२ नागर‍िकांनी प्राथम‍िक नोंदणी केली आहे. यात आधार, पॅन, डोमेसाईल, उत्पन व जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पडताळणी लॉनलाईन पद्धतीनेच करण्यात येत आहे. यासह शासनाच्या नियमानुसार 2018 नंतरचे डोमेसाईल तसेच जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या सदन‍िकांसाठी नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.

१२ नोव्हेबरपर्यंत मुदत

इच्छुकांना पीएमआरडीएअंतर्गत असलेल्या सदनिकांसाठी १२ नोव्हेबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१BHK) प्रवर्गातील २९.५५ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत १५,७४,४२४/- इतकी असून LIG (२ BHK) प्रवर्गातील ५९.२७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत ३५,५७,२००/ आहे. तर पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (१ RK) प्रवर्गातील २५.५२ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २०,९०,७७१/ असून LIG (१ BHK) प्रवर्गातील ३४.५७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २८,३२,२०८ आहे. या गृहप्रकल्पातील EWS प्रवर्गातील सदनिकांसाठी ५००० अनामत रक्कम असून LIG प्रवर्गातील सदनिकांसाठी १०,००० अनामत रक्कम आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी GST सह फॉर्म फी ७०८ रुपये लागणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0