PMPML Income in Rakshabandhan | रक्षाबंधन सणातील ४ दिवसात पीएमपी ला १० कोटींचे उत्पन्न! 

Homeadministrative

PMPML Income in Rakshabandhan | रक्षाबंधन सणातील ४ दिवसात पीएमपी ला १० कोटींचे उत्पन्न! 

Ganesh Kumar Mule Aug 12, 2025 7:15 PM

Pune Municipal Corporation | PMC Water Supply Department | फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण होणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम फक्त 60% पूर्ण!
Field officer | PMC Pune | शिक्षण विभागाच्या फिल्ड अधिकाऱ्यावर राहणार नजर 
7th Pay Commission | सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम अजूनही मिळेना  | 30 नोव्हेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश 

PMPML Income in Rakshabandhan | रक्षाबंधन सणातील ४ दिवसात पीएमपी ला १० कोटींचे उत्पन्न!

 

Pune PMP – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून यावर्षी दिनांक ८, ९ व १० व ११ ऑगस्ट २०२५ रोजी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या चारही दिवशी पीएमपीएमएल बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांचे मार्गदर्शनाखाली जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पीएमपी ला १० कोटींचे उत्पन्न मिळाले. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. (PMPML Bus)

८ ऑगस्ट रोजी पीएमपी कडून १९११ बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. या दिवशी सुमारे १२ लाख ३४ हजार ४८ प्रवाशांनी प्रवास केला. त्यांतून पीएमपी ला २ कोटी ४६ लाख ८९ हजार ९३५ रूपये एवढे उत्पन्न मिळाले. ९ ऑगस्ट रोजी पीएमपी कडून १९७५ बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. या दिवशी सुमारे १२ लाख ३१ हजार ५३` प्रवाशांनी प्रवास केला. त्यांतून पीएमपी ला २ कोटी ६१ लाख १९ हजार २७ रूपये एवढे उत्पन्न मिळाले. १० ऑगस्ट रोजी पीएमपी कडून १९३६ बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. या दिवशी सुमारे ११ लाख ७७  हजार ६०८  प्रवाशांनी प्रवास केला. त्यांतून पीएमपी ला २ कोटी ४५  लाख ८९  हजार ४२६ रूपये एवढे उत्पन्न मिळाले. ११ ऑगस्ट रोजी पीएमपी कडून १८७६ बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. या दिवशी सुमारे १२ लाख ४९ हजार ६९१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यांतून पीएमपी ला २ कोटी ८१ लाख ४२  हजार ६० रूपये एवढे उत्पन्न मिळाले.  असे चार दिवसात ७६९८ बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. त्यातून ४८लाख ९२ हजार ८७८ लोकांनी प्रवास केला. तर १० कोटी ३५ लाख ४० हजार ४४८ रुपये एवढे उतपन्न मिळाले.

प्राप्त उत्पन्नामध्ये तिकीट विक्री, पास विक्री, ई-तिकीट मशिनमधील क्यू आर कोड द्वारे झालेली तिकीट व पास विक्री तसेच मोबाईल अॅप द्वारे झालेली तिकीट व पास विक्री यांचा समावेश आहे. पीएमपीएमएल च्या बससेवेला प्रवाशांनी असाच प्रतिसाद द्यावा व जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: