PMPML CMD | दिपा मुधोळ – मुंडे यांनी स्वीकारला पीएमपीएमएल च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार
Deepa Mudhol- Munde – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ – मुंडे (CMD Deepa Mudhol – Munde) यांनी शनिवार १३ जुलै ला महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. (PMPML Pune)
सोमवार १५ जुलै रोजी स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे महामंडळाच्या सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेवून परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार – पवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.