PMPML Bus Pass | पीएमपीने 40 रुपयात पुणे मनपा हद्दीत दिवसभर फिरा

HomeपुणेBreaking News

PMPML Bus Pass | पीएमपीने 40 रुपयात पुणे मनपा हद्दीत दिवसभर फिरा

Ganesh Kumar Mule Sep 02, 2023 1:59 PM

Spit Bin | PMPML Bus Stop | पीएमपी बसस्थानकावर ‘स्पिट बिन’ बसवणार  | परिसर स्वच्छ ठेवणार 
PMPML | Om Prakash Bakoria | शहराच्या विकासासाठी व वाहूतक सुधारण्यासाठी जलद बस वाहतूक आवश्यक | ओम प्रकाश बकोरिया
Extra buses by PMPML | गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून ६५४ जादा बसेसचे नियोजन

PMPML Bus Pass | पीएमपीने 40 रुपयात पुणे मनपा हद्दीत दिवसभर फिरा 

| पीएमपीएमएल च्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी दैनिक व मासिक पास सुविधा सुरू

PMPML Bus Pass | पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (PMPML) पुणे व पिंपरी–चिंचवड शहरांसह (Pune and Pimpari Chinchwad) पी एम.आर.डी.ए. हद्दीत (PMRDA Limit) बससेवा पुरविण्यात येते. सध्या एका मनपा हद्दीसाठी दैनिकी पास  रूपये ४० व मासिक पास रूपये ९०० तर दोन्ही मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये५० व मासिक पास रूपये १२०० असे पास वितरीत करण्यात येत असून सदरची सुविधा सुरूच राहणार आहे. या व्यतिरिक्त पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास रू. १२० व मासिक पास रू. २७०० अशी पास सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. (PMPML Bus Pass) 

पी.एम.आर.डी.ए. संचलन क्षेत्रातील नोकरदार, महिला व लोकप्रतिनिधी यांनीपी.एम.आर.डी.ए. हद्दीतील प्रवाशांकरीता पूर्वीच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी असलेल्यापासच्या दरात काही प्रमाणात दरवाढ करून पूर्वीप्रमाणेच दैनिक पास व मासिक पाससुरू करणेबाबत वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे.

त्यास अनुसरून पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास रू. १२० व मासिक पास रू. २७०० सुरू करणेस मा. संचालक मंडळाचे बैठकीत निर्णय झालेला आहे. (PMPML Pune) 

समासिक पाससाठी प्रवाशांनी परिवहन महामंडळाचे नजीकचे पास केंद्रावर जाऊन  आधार कार्डची झेरॉक्स प्रत व फोटो देऊन प्रवाशी ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच दैनिक पाससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र बसमधील वाहकाला दाखवून वाहकांकडून  दैनिक पास घेता येईल. सदरील पास सुविधा दि. ०४/०९/२०२३ पासून सुरू करण्यात आली आहे.

तरी जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता सुरूकरण्यात येत असलेल्या दैनिक व मासिक पास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणेमहानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.