शहराच्या विकासासाठी व वाहूतक सुधारण्यासाठी जलद बस वाहतूक आवश्यक | ओम प्रकाश बकोरिया
शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक वाहूतक सुधारण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट (जलद बस वाहतूक) आवश्यक आहे आणि ह्याच बी.आर.टी सक्षमीकरणासाठी आम्ही भर देणार आहोत. असे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. (PMPML CMD Om Prakash Bakoria)
पीएमपीएमएलकडून बी.आर.टी बाबत २ दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील मधील बीआरटीचे नेटवर्क सुधारून त्यावर विविध उपाय योजना होण्यासाठी विद्यमान बी.आर.टी.एस नेटवर्क सुधारण्यासाठी आणि भविष्यातील विस्ताराची योजना ओळखण्यासाठी पीएमपीएमएलकडून ९ व १० फेब्रुवारी रोजी २ दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
शहरातील एनजीओ परिसर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई), शहरी वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे आणि सर्ग डिझाइन स्टुडिओचे योगेश दांडेकर यांच्या तांत्रिक सहाय्याने घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक हॉलमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिसर संस्थेचे पदाधिकारी, पीएमपी प्रवासी मंचचे पदाधिकारी, वाहतूक तज्ञ,पीएमपीएमएल, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे व पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित
होते.
पुण्यातील बी.आर.टी कॉरिडॉर दररोज ४ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देतो. बी.आर.टी नेटवर्कचा विस्तार केल्यास त्यात वाढ होऊ शकते असे मत सर्व उपस्थित तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. विद्यमान पिंपरी-चिंचवड कॉरिडॉरशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी काही कॉरिडॉर पूर्ण करणे आवश्यक आहे असे मत वाहतूक तज्ञांनी यावेळी व्यक्त केले. पुणे व पिंपरी –चिंचवड महानगरपालिकांकडून अपेक्षा याबाबत सहभागी तज्ञांनी सूचना केल्या.