PMPML Bus | रक्षाबंधन निमित्ताने पीएमपीला मिळाले जवळपास 4 कोटींचे उत्पन्न
PMP Bus | RakshaBandhan – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. (PMRDA) हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून 19 व 20 ऑगस्ट रोजी नियोजित 1692 शेड्युल व्यतिरिक्त 130 जादा बसेसचे नियोजन करून सदर बसेस गर्दीच्या मार्गांवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पीएमपीएमएल च्या बससेवेला 19 व 20 ऑगस्ट रोजी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही दिवशी पीएमपी ला ३ कोटी ९५ लाखाचे उत्पन्न मिळाले. दरम्यान मागील वर्षीया सणानिमित्त पीएमपीला कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले होते. (PMP Bus | RakshaBandhan)
रक्षाबंधन सणानिमित्त विशेषतः महिला प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेतला. 19 ऑगस्ट ला १३ लाख 18 हजार 969 प्रवाशांची नोंद झाली. तर 20 ऑगस्ट ला 14 लाख 14 हजार 499 प्रवाशांची नोंद झाली. पीएमपीएमएल च्या बससेवेला असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
COMMENTS